जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / वर्गात विद्यार्थी नवे पण मास्तर तेच! Bigg Boss Marathi 4 साठी महेश मांजरेकरच करणार सूत्रसंचालन; प्रोमो आऊट

वर्गात विद्यार्थी नवे पण मास्तर तेच! Bigg Boss Marathi 4 साठी महेश मांजरेकरच करणार सूत्रसंचालन; प्रोमो आऊट

Mahesh Manjrekar hosting BBM season 4

Mahesh Manjrekar hosting BBM season 4

बिग बॉस मराठी सिझन 4 साठी प्रेक्षक भलतेच उत्सुक झाल्याचं समोर येत होतं. आता प्रेक्षकांसाठी एक नवी आनंदाची माहिती समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 13 ऑगस्ट: बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनची सध्या सगळीकडे हवा आहे. नवा सिझन येणार अशी माहिती समोर आल्यापासूनच एक वेगळीच उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसत आहे. मागच्या तीनही सिझनला मिळालेला प्रतिसाद बघता येणार नवा सिझन अजून भव्य असणार याची कल्पना येत आहेच पण नव्या सिझनच्या होस्टबद्दल बरीच वेगवेगळी माहिती समोर येत होती. आता मात्र कार्यक्रम बघायला उत्सुक असलेल्यांनी आनंद व्यक्त करायला हरकत नाही कारण या नव्या (mahesh manjrekar bbm season 4 host) सीझनचे होस्ट सुद्धा महेश मांजरेकरच असणार अशी माहिती समोर आली आहे. कलर्स मराठी आणि स्वतः महेश मांजरेकर यांनी या माहितीला पुष्टी दिली आहे. कलर्स वाहिनीच्या इन्स्टाग्राम पेजवरून एक प्रोमोसुद्धा शेअर करण्यात आला आहे.

जाहिरात

इतके दिवस महेश या नव्या सिझनचं सूत्रसंचालन करणार नाहीत असं सांगण्यात येत होतं. त्यांच्याशिवाय या घराला मजा नाही असं चाहत्यांचं म्हणणं होतं. त्यांना परत आणा अशी मागणीसुद्धा केली जात होती. आता चाहत्यांच्या मागणीचा आदर ठेवत महेश नव्या सीझनच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळताना दिसणार आहेत. हे ही वाचा-  Amruta Khanvilkar: बिल्डिंगच्या पार्किंगपासून ते धकधक गर्लसोबत डान्स; चंद्राची रियल लाईफ डान्स जर्नी आहे एकदम झकास ‘खेळाडू नवे, घर नवे पण होस्ट… मीच कारण वर्गात विद्यार्थी बदलतात मास्तर मात्र एकच असतात.” असं म्हणत एकदम बिनधास्त अंदाजात महेश यांचं आगमन होताना दिसत आहे. महेश यांच्या सूत्रसंचलनाने कार्यक्रमात एक वेगळा उत्साह येतो. दरवेळी वीकएंडच्या डावमध्ये महेश कन्टेस्टंटची शाळा घेत असतात. यावेळी सुद्धा त्यांना मास्तरांच्या खुर्चीत बसलेलं बघायला नक्कीच मजा येणार अशी प्रतिक्रिया समोर येत आहे. यावेळी मात्र शाळा घ्यायची स्टाईल एकदम हटके असणार असेही संकेत प्रोमोमध्ये देण्यात आले आहेत. एकूणच बिग बॉसचा हा नवा सिझन एकदम रंगतदार होणार हे दिसत आहे. हे ही वाचा-  Big Boss Marathi 4: ‘हे’ आघाडीचे कलाकार असणार बिग बॉस मराठीचा भाग? अनेक नावांची होतेय चर्चा मागच्या काही दिवसात सिद्धार्थ जाधवचं नाव या कार्यक्रमाच्या होस्टसाठी घेतलं जात होतं. नव्या सिझनसाठी कार्यक्रमाचे मेकर्स हे सिद्धार्थला अप्रोच झाल्याचं सांगण्यात येत होतं. या बातमीने अनेक चाहते निराश सुद्धा झाले होते. पण आता नवा सिझन महेश होस्ट करणार या बातमीने मात्र चाहत्यांमध्ये आनंदाची लहर उसळली आहे. बिग बॉसच्या या सीझनमध्ये कोणे स्पर्धक असणार याची एक संभाव्य यादी सुद्धा सध्या खूप viral होत आहे. याबाबत अजून कोणतंही स्पष्टीकरण वाहिनीने दिल नसल्याचं समोर येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात