मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'मित्र आपल्या मागून आपलीच एवढी इज्जत नाही काढत...', स्नेहाने साधला जयवर निशाणा

'मित्र आपल्या मागून आपलीच एवढी इज्जत नाही काढत...', स्नेहाने साधला जयवर निशाणा

Bigg Boss Marathi Season 3: रविवारी झालेल्या एलिमिनेशनच्या गंमतीनंतर आज घरातील सदस्यांना मोठं सरप्राईज मिळणार आहे कारणं घरामध्ये नव्या सदस्यांची एंट्री होणार आहे

  • Published by:  Janhavi Bhatkar
मुंबई, 06 डिसेंबर: बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 3) घरामधून रविवारी कोणाचेच एलिमिनेशन झाले नाही. कोणताच सदस्य घराबाहेर न पडल्याने काल बिग बॉसच्या घरात आनंदाचे वातावरण होते. रविवारी महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar Latest News) यांनी जेव्हा मीरा जगन्नाथ आऊट झाल्याचे सांगितले तेव्हा मीरासह सर्व भावुक झाले होते. मात्र मीराला यावेळी फसवण्यात आलं होतं. ती घराबाहेर जाणार असं वाटतं असतानाच तिला चिठ्ठी मिळाली ज्यात फसवलं असं लिहिलं होते. दरम्यान आता या एलिमिनेशनच्या गंमतीनंतर आज घरातील सदस्यांना मोठं सरप्राईज मिळणार आहे कारणं घरामध्ये नव्या सदस्यांची एंट्री होणार आहे. हे नवीन सदस्य म्हणजे या तिसऱ्या सीझनचेच जुने सदस्य अर्थात स्नेहा वाघ, आदिश वैद्य आणि तृप्ती देसाई. आता हे तिघे घरात गेल्यानंतर सदस्यांमधील नाती किती बदलणार? घरातील समीकरण किती बदलणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. हे वाचा-'थोडी तर लाज बाळग' ; उर्फी जावेद पुन्हा विचित्र कपड्यामुळे ट्रोल, video viral नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉसने जाहीर केले आहे की घरात नवीन सदस्य येत आहेत. यावेळी स्नेहा वाघ, आदिश वैद्य आणि तृप्ती देसाई यांची एंट्री झाली. घरामध्ये एंट्री घेताच स्नेहाने जयवर निशाणा साधला. स्नेहाने जयला खडेबोल सुनावत अशी म्हणाली की, 'या घरात सुरुवातीपासूनच जो कोणी माझ्याशी गेम खेळत होता तो फक्त जय दुधाणे होता. आपलेच मित्र आपल्या मागून आपलीच एवढी इज्जत नाही काढतं.' यामध्ये जय देखील एका सुटकेसवर जोरदार हात आपटताना दिसत आहे. त्यामुळे नेमकं काय घडलं याची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली आहे.
स्नेहाच्या या वक्तव्यामुळे बिग बॉसचा नवा प्रोमो चांगलाच व्हायरल होत आहे. आता हे तीन नवे सदस्य घरामध्ये गेल्यावर काय काय घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. हे वाचा-बिग बॉसच्या घरात यावेळी नो एलिमिनेशन मात्र पुढीलवेळी डब्बल एलिमिनेशन! 'बिग बॉस मराठी' या शो ने मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. आता या शो चे केवळ 3 आठवडे शिल्लक आहेत. अर्थातच ग्रँड फिनाले जवळ येत आहे. त्यामुळे सर्वजण आपलं स्थान पक्क कण्यासाठी धडपड करत आहे. आणि यातूनच घरातील स्पर्धकांच्या मैत्रीमध्ये फूट पडताना दिसून येत आहे.
First published:

Tags: Bigg boss marathi

पुढील बातम्या