Home /News /entertainment /

Bigg Boss Marathi च्या घरात यावेळी नो एलिमिनेशन मात्र पुढील आठवड्यात डब्बल एलिमिनेशन!

Bigg Boss Marathi च्या घरात यावेळी नो एलिमिनेशन मात्र पुढील आठवड्यात डब्बल एलिमिनेशन!

मीरा जर आज आऊट झाली असती तर आतापर्यतच या घरातील सर्वात मोठ एलिमेशन ठरल असतं. मात्र महेश मांजरेकर यांनी सांगून ठाकले की वोटींग लाईन बंद असल्याने मीरा घरातून जाणार नाही. यानंतर घरात आनंद आणि आनंद पाहिला मिळाला.

  मुंबई, 5 डिसेंबर- बिग बॉस मराठीच्या घरात (Bigg Boss Marathi 3 ) आज काही वेळापूर्वी दुखाचे वातावरण होते. कारण महेश मांजरेकर यांनी जेव्हा मीरा जगन्नाथ आऊट झाल्याचे सांगितले तेव्हा मीरासह सर्व भावूक झाले. मात्र मीर घरात तर लोकप्रिय आहेच मात्र घराबाहेर देखील तिचा तितकाच बोलबाला आहे. मीरा जर आज आऊट झाली असती तर आतापर्यतच या घरातील सर्वात मोठ एलिमेशन ठरल असतं. मात्र महेश मांजरेकर यांनी सांगून ठाकले की वोटींग  (bigg boss marathi no elimination ) लाईन बंद असल्याने मीरा घरातून जाणार नाही. यानंतर घरात आनंद आणि आनंद पाहिला मिळाला. बिग बॉसच्या घरात हा आनंद जास्त काळ टिकणार नाही. कारण पुढील आठवड्यात दोन एलिमेशन होणार असल्याचे महेश मांजरेकर यांनी सांगितलं आहे. यासोबतच घरातील सदस्यांच्या आनंदात विरजण टाकण्यासाठी आता घरातील काही जुने सदस्य घरात परत एंट्री करणार आहेत.
  यातल एक नाव आहे स्नेहा वाघ तर दुसरे नाव आहे आदिश वैद्य आणि तिसरे नाव आहे तृप्ती देसाई यांचे. आता हे सदस्य घरात काय धुमाकूळ घालणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणारा आहे. आता जरी घरात स्पर्धक आठ उरले असले तरी हे नवीन येणारे तीन स्पर्धक घरातील सदस्यांना हालवून सोडणार एवढे नक्की आहे. कारण हे तिघेही बाहेरून शो पाहून आले आहेत. वाचा : video : मीरा-उत्कर्षमध्ये काहीतरी शिजतंय; घरातील सदस्य करतायत उलट सुलट चर्चा 'बिग बॉस मराठी'   (Bigg Boss 15)  या शो ने मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. आता या शो चे केवळ ३ आठवडे शिल्लक आहेत. अर्थातच ग्रँड फिनाले जवळ येत आहे. त्यामुळे सर्वजण आपलं स्थान पक्क कण्यासाठी धडपड करत आहे. आणि यातूनच घरातील स्पर्धकांच्या मैत्रीमध्ये फूट पडताना दिसून येत आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bigg boss, Bigg boss marathi, Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या