जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'थोडी तर लाज बाळग'; उर्फी जावेद पुन्हा विचित्र कपड्यामुळे ट्रोल, video viral

'थोडी तर लाज बाळग'; उर्फी जावेद पुन्हा विचित्र कपड्यामुळे ट्रोल, video viral

'थोडी तर लाज बाळग'; उर्फी जावेद पुन्हा विचित्र कपड्यामुळे ट्रोल, video viral

उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असते. यावेळी तिचा एक जुना व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. जो तिने स्वतः तिच्या इन्स्टावर देखील शेअर केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 5 डिसेंबर- उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असते. उर्फी तेव्हा प्रसिद्धीझोतात आली जेव्हा ती टीव्हीच्या सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी’ (Bigg Boss OTT)’ चा भाग बनली. उर्फी या शोमध्ये खूप काळ टिकू शकली नाही मात्र तिला या शोमधून खूप प्रसिद्धी मिळाली. मात्र उर्फी याचा पुरेपूर फायदा घेताना दिसली, उर्फी ​​जावेद सार्वजनिक ठिकाण असो वा विमानतळ सर्वत्र तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. सोशल मीडियावर दिवसेंदिवस तिच्या फोटोंचा बोलबाला असतो. मात्र यावेळी तिचा एक जुना व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. जो तिने स्वतः तिच्या इन्स्टावर देखील शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये उर्फीची अतिशय बोल्ड स्टाईल पाहायला मिळत आहे. वाचा : video : मीरा-उत्कर्षमध्ये काहीतरी शिजतंय; घरातील सदस्य करतायत उलट सुलट चर्चा व्हिडिओ एक लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे व्हिडिओमध्ये उर्फी पहिल्यांदा नाईट ड्रेसमध्ये दिसते पण क्षणार्धात तिचा ड्रेस बदलला आणि ती निळ्या वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसली. उर्फीने 16 नोव्हेंबरला इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत एक लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. उर्फी तिच्या या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. वास्तविक, उर्फीने व्हिडिओमध्ये घातलेला निळ्या रंगाचा ड्रेस लोकांना आवडला नाही. या व्हिडिओवर कमेंट करताना यूजर्स तिच्या ड्रेसला बेकार म्हणत आहेत. एका युजरने तिला आंटी म्हणत ‘थोडी तर लाज बाळग’ अशी कमेंट केली आहे.

जाहिरात

उर्फी फिटनेसकडे देते खूप लक्ष उर्फी जावेद तिच्या फिटनेसबाबत खूप जागरूक आहे. इन्स्टाग्रामवर ती अनेकदा फिटनेसशी संबंधित व्हिडिओ पोस्ट करत असते. उर्फी एक उत्तम गायिका देखील आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. तिला रॅपिंग आवडते. मुंबईत येण्यापूर्वी उर्फीने काही दिवस दिल्लीतील एका कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणूनही काम केले आहे. ‘डेढ़ी-मेढ़ी फैमली’ या टीव्ही शोमधून तिनं आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात