• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Bigg Boss Marathi च्या घरातून ही सदस्य पडली बाहेर ; स्नेहा वाघ आणि जय दुधाणेला अश्रू अनावर

Bigg Boss Marathi च्या घरातून ही सदस्य पडली बाहेर ; स्नेहा वाघ आणि जय दुधाणेला अश्रू अनावर

या आठवड्यामध्ये सुरेखा कुडची, संतोष चौधरी (दादुस), विशाल निकम, तृप्ती देसाई, विकास पाटील, सोनाली पाटील, मीनल शाह आणि स्नेहा वाघ हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट झाले होते.

 • Share this:
  मुंबई. 17 ऑक्टोबर : बिग बॉस मराठी सीजन 3 च्या (  Bigg Boss Marathi 3 ) या आठवड्यातील बिग बॉसची चावडीमध्ये बिग बॉस मराठीच्या मागील पर्वातील दोन लोकप्रिय असे टॉप टू स्पर्धक  (  Bigg Boss Marathi 3 Latest Update) आले होते. ज्यांनी अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. बिग बॉस मराठी सिझन 2 चा विजेता शिव ठाकरे आणि दुसरे स्थान पटकावलेली नेहा शितोळे घरात आले होते. त्यांनी स्पर्धकांची कानउघडणी केली. यासोबतच रोज डे देखील सेलिब्रेट केला.बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या प्रेक्षकांची अतरंगी डिमांड पूर्ण केली. तर चुगली बूथद्वारे सोनाली पाटीलला तिच्याविरुध्द सदस्य जे बोलत होते ते तिच्या फॅनने सांगितले. जय आणि आदिशचा रोमॅंटिक डान्स बघायला मिळाला. तर, सदस्यांनी एकमेकांनबद्दल असलेल्या तक्रारी सदस्यांना सांगितल्या. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की, बिग बॉसच्या घरामध्ये आता नॉमिनेशन प्रक्रिया सुरु झाली असून या घरामधून आता दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर जाणे अनिवार्य असणार आहे.या आठवड्यामध्ये सुरेखा कुडची, संतोष चौधरी (दादुस), विशाल निकम, तृप्ती देसाई, विकास पाटील, सोनाली पाटील, मीनल शाह आणि स्नेहा वाघ हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट झाले होते. आता या आठ जणांमधून आज कोणाला घराबाहेर जावे लागेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक होते. बिग बॉस मराठीच्या घरामधून सुरेखा कुडची बाहेर...
  बिग बॉस मराठीच्या घरामधून सुरेखा कुडची बाहेर...
  शेवटी स्नेहा वाघ आणि सुरेखा कुडची डेंजर झोनमध्ये होते आणि महेश मांजरेकर यांनी घोषित केले की, या आठवड्यामध्ये सुरेखा कुडची यांना बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले. तृप्ती देसाई, स्नेहा, जय आणि घरातील इतर सदस्यांना अश्रू अनावर झाले. तेंव्हा आता पुढील आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईल ? कोण घराचा नवा कॅप्टन बनेल ? सदस्यांना कोणते टास्क मिळणार हे बघणे रंजक असणार आहे. वाचा :VIDEO : मलायकाचा एअरपोर्ट लुक व्हायरल; प्रिटेंड ड्रेसमध्ये दिसत होती खूपच ग्लॅमरस सुरेखा कुडची म्हणाल्या की, “या घरामध्ये माणूस म्हणून कोणीच वाईट नाही. परिस्थितिमुळे होतं तसं. पण, मी ठरवलं होतं जेव्हा मी एलिमनेट होईन तेव्हा मी रडणार नाही. पण या घरामध्ये काहीतरी जादू आहे”. महेश मांजरेकर यांनी सुरेखा ताईंना विशेष अधिकार दिला त्याप्रमाणे त्यांनी तृप्ती देसाई यांना कॅप्टन बनवले. वाचा :  The Big Pictureच्या सेटवर रणवीर सिंहला अश्रू अनावर; हे आहे कारण... बिग बॉस मराठीच्या सिझन तिसरामध्ये घरामधून सुरेखा कुडची घराबाहेर पडल्या आहेत. आता येत्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होईल ? प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवेल ? आणि कोण घराबाहेर जाईल ? हे बघणे रंजक असणार आहे.तेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन 3 सोम ते रवि रात्री 9.३30 वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर.
  Published by:News18 Trending Desk
  First published: