जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / The Big Pictureच्या सेटवर रणवीर सिंहला अश्रू अनावर; हे आहे कारण...

The Big Pictureच्या सेटवर रणवीर सिंहला अश्रू अनावर; हे आहे कारण...

The Big Pictureच्या सेटवर रणवीर सिंहला अश्रू अनावर; हे आहे कारण...

‘द बिग पिक्चर’च्या पहिल्या भागाची आणि रणवीरच्या अंदाजाची सगळीकडं जोरदार चर्चा रंगलेली आहे. मात्र शोच्या दुसऱ्याचा भागात रणवीर भावूक झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई. 17 ऑक्टोबर : रणवीर सिंह (Ranveer Singh ) ‘द बिग पिक्चर’ **(The Big Picture)**हा रिअॅलिटी शो 16 ऑक्टोबरपालून सुरू झाला आहे. रणवीरने शोमधील पहिल्या स्पर्धाकासोबत शोची धमाकेदार सुरूवात केली आहे. रणीवरने स्पर्धाकाला प्रोत्साहन देत त्याला हाताने चप्पल घातले. शोच्या पहिल्या भागाची आणि रणवीरच्या अंदाजाची सगळीकडं जोरदार चर्चा रंगलेली आहे. मात्र शोच्या दुसऱ्याचा भागात रणवीर भावूक झाला आहे. त्याच्या भावूक होण्यामागे काय कारण आहे असा प्रश्न सर्वांना पडला आहे. या शोच्या दुसऱ्याच भागात गोरखपूरमध्ये राहणार अभय सिंह हा स्पर्धक त्याची दुखद अशी कहाणी सांगतो. त्याची दुखद कहाणी ऐकताच रणवीर भावूक होतो. या स्पर्धाकाने सांगितलं की, 12 व्या वर्षी वडिलांना गमावलं. माझ्या वडिलांची शेवटची इच्छा होती की मी माझ्या घराच्यांचा सांभाळ करावा त्यांची संपूर्ण जबाबदारी घ्यावी. बालपन असंच गेलं नंतर अभयने शाळेत शिकवण्यास सुरूवात केली आणि त्यातूनच घरखर्चासाछी पैसे मिळू लागल्याचे त्याने सांगितलं.

जाहिरात

रणवीरला झाले अश्रू अनावर स्पर्धकाचा हा संघर्ष ऐकून रणवीरचे हृदय भरून आणि तो त्याचे अश्रू रोखू शकला नाही. रणवीर व्हिडिओ कॉल्सद्वारे स्पर्धकाच्या आईशी बोलतो. रणवीरला सिनेमात आपण भावूक झाल्याले पाहिलं आहे मात्र प्रत्यक्षात तो पहिल्यांदा भावनिक होताना दिसला वाचा : रणवीर सिंह-दीपिका पादुकोणकडे GOOD NEWS? बाळांच्या नावाची यादीही तयार रणवीरने या शोदरम्यान सांगितला फॅमेलि प्लॅनिंगचा प्लॅन रणवीर सिंहचा हा पहिला टीव्ही शो आहे. हा शो तो होस्ट करताना दिसत आहे. शो सुरू होऊन एकच दिवस झाला आहे मात्र रणवीरचा या शोमधील हटके अंदाज पाहून सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू आहे. रणवीर या शोमध्ये त्याच्या लग्नाविषयी आणि मुलांविषयी बोलताना दिसला. तो म्हणाला की, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की माझं लग्न झालं आहे आणि आता दोन ते तीन वर्षात माझी मुलं होतील. भाऊ, तुमची वहिनी दीपिका लहान असताना इतकी सुंदर होती. मी रोज तिच्या लहानपणीचा फोटो पाहत होतो आणि म्हणत होतो की, मला अशीच एक मुलगी दे जी माझं आयुष्य बदलून टाकेल. मी तर नाव शॉर्टलिस्ट करत आहे. जर मी तुमचं नाव शौर्य त्या लिस्टमध्ये समाविष्ट केलं तर तुम्हाला काही हरकत नाही ना?..

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात