जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / अर्जुन कपूरला सोडून मलायका अरोराने धरला मराठी बिग बॉस विजेता शिव ठाकरेचा हात, रोमॅंटिक डान्स पाहून पडाल प्रेमात!

अर्जुन कपूरला सोडून मलायका अरोराने धरला मराठी बिग बॉस विजेता शिव ठाकरेचा हात, रोमॅंटिक डान्स पाहून पडाल प्रेमात!

अर्जुन कपूरला सोडून मलायका अरोराने धरला मराठी बिग बॉस विजेता शिव ठाकरेचा हात, रोमॅंटिक डान्स पाहून पडाल प्रेमात!

सध्या मलायका अरोराचा एक रोमॅंटिक अंदाजातील डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे तिच्या या डान्स व्हिडिओमध्ये अर्जुन कपूर दिसत नाही तर मराठी बिग बॉस (bigg boss marathi ) विजेता शिव ठाकरे (shiv thackeray) दिसत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 मार्च- बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ( malaika arora ) आणि अर्जुन कपूरचं नातं आजपर्यंत कुणापासून लपलेले नाही. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करत असतात. दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा नेहमीच सोशल मीडियावर रंगलेली असते. सध्या मलायका अरोराचा एक रोमॅंटिक अंदाजातील डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे तिच्या या डान्स व्हिडिओमध्ये अर्जुन कपूर दिसत नाही तर मराठी बिग बॉस  (bigg boss marathi ) विजेता  शिव ठाकरे (shiv thackeray)  दिसत आहे. शिव ठाकरेला मलायकासोबत अनेकांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत. शिव ठाकरेने मलायकासोबतचा डान्स व्हिडिओ त्याच्या इन्स्टाला शेअर केला आहे. या व्हिडिओतशिव आणि मलायकाने बॉलिवूकड अभिनेता शाहरुख खानच्या ओम शांती ओम या चित्रपटातील ‘आखो मे तेरी अजब सी’ या रोमॅंटिक गाण्यावर डान्स केल्याचा दिसत आहे. दोघांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. चाहत्यांकडून तर कमेंटचा वर्षाव होत आहे. वाचा- तुझ्यातली आवडणारी गोष्ट म्हणजे..शालिनीची जाऊबाई देवकीसाठी जोरात पोस्ट नेमका मलायकाचा आणि शिवचा हा व्हिडिओ कशासाठी शूट करण्यात आला आहे याबद्दल माहिती मिळालेली नाही. शिवाय अनेकांना उत्सुकता देखील लागली आहे की, शिव ठाकरे मलायका अरोरासोबत कोणता प्रोजेक्ट करणार आहे का.. शिव ठाकरेला सर्वजण अभिनेता म्हणून सगळे ओळखतात मात्र तो एक उत्तम डान्सर देखील आहे. सोशल मीडियावर देखील शिव त्याचे डान्स व्हिडिओ शेअर करत असतो. मलायकासोबत शिवला पाहून चाहते मात्र भारावून गेले आहेत.

जाहिरात

मलायाका नेहमीच तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे तसेच फिटनेसमुळे चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून फिटनेसबद्दल माहिती ती शेअर करत असते. शिवबद्दल सांगायचे तर तो वीणा जगतापसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत होता. मात्र आता ते दोघे एकत्र दिसत नाहीत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात