जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / तुझ्यातली खूप आवडणारी गोष्ट म्हणजे...माधवी निमकरची ऑनस्क्रीन जाऊबाईसाठी जोरात पोस्ट

तुझ्यातली खूप आवडणारी गोष्ट म्हणजे...माधवी निमकरची ऑनस्क्रीन जाऊबाईसाठी जोरात पोस्ट

तुझ्यातली खूप आवडणारी गोष्ट म्हणजे...माधवी निमकरची ऑनस्क्रीन जाऊबाईसाठी जोरात पोस्ट

सुख म्हणजे नक्की काय असतं फेम मीनाक्षीचा (Minakshi Rathod Birthday) आज वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवासानिमित्त तिच्या ऑनस्क्रीन जाऊबाई शालिनी वहिनी यांनी तिच्यासाठी जोरात पोस्ट लिहिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 मार्च- ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढतीय. या मालिकेत देवकीची भूमिका अभिनेत्री मीनाक्षी राठोड (Minakshi Rathod) हिने साकारलीय. यामध्ये मीनाक्षी राठोड हिची विनोदी भूमिक असली तरी नकारत्मक आहे. मीनाक्षीचा (Minakshi Rathod Birthday) आज वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवासानिमित्त तिच्या ऑनस्क्रीन जाऊबाई शालिनी वहिनी यांनी तिच्यासाठी जोरात पोस्ट लिहिली आहे. शालिनीची भूमिका मालिकेच अभिनेत्री माधवी निमकरने  ( maadhavi nimkar ) साकारली आहे. माधवी आणि मीनाक्षीची मालिकेतील केमेस्ट्री प्रेक्षकांना देखील खूप आवडते. विनोदी अंदाजाने दोघींही प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. शिवाय सोशल मीडियावर दोघी रील्स शेअर करत असतात. जाऊबाई नेहमी जोरात असतात मग सेटवर असुदे किंवा सोशल मीडियावर. मीनाक्षीच्या वाढदिवसानिमित्त माधवीनं एक पोस्ट लिहिली आहे. वाचा- VIDEO : अरुंधती होळी साजरी करणार आशुतोषसोबत, रंगणार सुरांची मैफिल माधवीनं पोस्टमध्ये म्हटलं आहे की, दोन वर्ष होत आली आपण एकत्र काम करतोय ❤️…खूप मजा आली , तुझा सोबत सीन करताना खूप हसले ..खूप स्पष्ट आहेस तू, कधी कधी बाहेरून थोडी कडकपण आतून तितकीच प्रेमळ…खूप छान वेळ आपण एकत्र घालवला आहे आपण …खूप सुख दुःख share केली आहेत…खूप छान आठवणी आहेत तुझा सोबत…एक तुझ्यातली खूप आवडणारी गोष्ट म्हणजे कधी judgemental झाली नाहीस…on screen असो किंवा off screen…

जाहिरात

तुझा स्वभावातला स्पष्टवक्तेपणा मला घ्यायला आवडेल …अशीच रहा कायम ( जरा जास्त झालं का ? असुदे, आज तुझा वाढदिवस आहे )मला आमचं हे madhead लय आवडतWish you many many happy returns of the day…may your allllll dreams come true ❤️..माधवीच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे. सर्वांनी मीनाक्षीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात