मुंबई, 30 नोव्हेंबर : बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांची एंट्री होऊन आता 50 दिवस उलटून गेले आहेत. आतापर्यंत सदस्यांनी अनेक टास्क खेळले, एकमेकांशी भांडणं केली, शाब्दिक चमकमी झाल्या. पण आता 50 दिवसांनी सदस्यांची घरात राहण्यासाठी होणारी चुरस त्यांच्या अंगाशी आल्याचं पाहायला मिळत आहे. जिंकण्याच्या उद्देशानं सदस्य कोणाचीही पर्वा करताना दिसत नाहीत. या सदस्यांचा खरा चेहरा आता समोर आला आहे. आता घरात 4 वाईल्ड कार्ड स्पर्धकांनी एंट्री घेतली असून खेळ चांगलाच रंगात आला आहे. दरम्यान बिग बॉसच्या घरातील लोकप्रिय सदस्य तेजस्विनी लोणारी आता घरातून बाहेर पडणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. पण काय आहे त्यामागील सत्य जाणून घ्या. बिग बॉस मराठीच्या घरातुन मागच्या आठवड्यात समृद्धी जाधव घराबाहेर पडली होती. आता तेजस्विनी लोणारीचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपला अशा बातम्या समोर आल्या. तेजस्विनीला एका टास्कदरम्यान हाताला गंभीर दुखापत झाली होती. गेले काही दिवस ती घरात हाताला प्लास्टर घेऊन वावरताना दिसत आहे. पण असं असलं तरी तिच्या गेममध्ये ती अजिबात मागे पडली नाही. पण आता याच कारणामुळे तिला खेळातून बाहेर पडायचं की ‘बिग बॉस’च्या घरात राहायचं, हा निर्णय तेजस्विनीला घेण्यास बिग बॉसने सांगितला होता. त्यावेळी तेजस्विनीने घरात राहून खेळ खेळण्यासाठी बिग बॉसला विनंती केली होती. परंतु, त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेतला जाईल, असं बिग बॉसने सांगितलं होतं. हेही वाचा - Kriti Sanon-Prabhas: क्रितीने अखेर प्रभाससोबतच्या नात्याबद्दल तोडलं मौन; म्हणाली ‘माझ्या लग्नाची तारीख जाहीर…’ ता अखेर डॉक्टरांचा सल्ला आला आहे. आणि त्यांच्या सल्ल्यानुसार तेजस्विनीला घरातून एक्झिट घ्यावी लागणार आहे. नुकतंच कलर्स मराठीने एक प्रोमो रिलीज केला आहे. त्यानुसार तेजस्विनीला निरोप देताना घरातील सदस्य भावुक झालेले पाहायला मिळत आहेत. तेजस्विनीची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आल्यानंतर बिग बॉसने निर्णय दिला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हाताच्या दुखापतीमुळे तेजस्विनीला पुढील खेळ खेळणे सोयीचे नसल्याने तिला बिग बॉसच्या घरातून तिला निरोप घ्यावा लागणार आहे. ‘बिग बॉस’च्या येणाऱ्या भागात तेजस्विनी घरातून बाहेर पडणार आहे. तेजस्विनीला निरोप देताना घरातील सदस्यही भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. पण तेजस्विनी कायमची बिग बॉसमधून बाहेर पडणार नसून काही काळासाठी हाताची दुखापत बारी होईपर्यंतच घर बाहेर राहील. काही काळानंतर ती पुन्हा घरात परतण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
मात्र तेजस्विनीने या सगळ्या बातम्यांची पुष्टी केली नाहीये. तिने अलीकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट करत ‘‘वाघीण भले ही घायाळ असेल पण ती कधीच give up करत नाही, कधीच हिम्मत हारत नाही. तशीच आमची शेरणी पण injured जरी असली तरी चेहऱ्यावर हसू आणि मनात जिद्द कायम आहे.’’ असे म्हटले आहे. तिच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच तिच्या एक्झिटनंतर चाहते नाराज झालेले देखील दिसून येत आहे.
आता सध्या घरात चार वाईल्ड कार्ड एंट्री झाल्या आहेत. यामध्ये विशाल निकम, मीरा जगन्नाथ आणि आरोह वेलणकर हे तीन जुने सदस्य तर राखी सावंत या नवीन सदस्यांची एंट्री झाली आहे. त्यामुळे घरातील खेळाला नवीन रंगत आली आहे. आता घरातून तेजस्विनी कायमची बाहेर पडणार कि परतणार हे येणाऱ्या काळात समजेल.