मुंबई, 01 डिसेंबर : बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांची एंट्री होऊन आता 50 दिवस उलटून गेले आहेत. आतापर्यंत सदस्यांनी अनेक टास्क खेळले, एकमेकांशी भांडणं केली, शाब्दिक चमकमी झाल्या. पण आता 50 दिवसांनी सदस्यांची घरात राहण्यासाठी होणारी चुरस त्यांच्या अंगाशी आल्याचं पाहायला मिळत आहे. जिंकण्याच्या उद्देशानं सदस्य कोणाचीही पर्वा करताना दिसत नाहीत. या सदस्यांचा खरा चेहरा आता समोर आला आहे. आता घरात 4 वाईल्ड कार्ड स्पर्धकांनी एंट्री घेतली असून खेळ चांगलाच रंगात आला आहे. बिग बॉस मराठीच्या घरात आज कॅप्टन पदाच्या उमेदवाराची नियुक्ती होणार आहे आणि त्याचसाठी सदस्य अगदी मन लावून तयारी करत आहेत. आधी कॅप्टन्सीसाठी घरात डान्स पार्टी पार पडली. सगळे सदस्य आपला डान्स कसा उत्तम होईल याच्या प्रयत्नात होते. किरण माने, विकास आणि अपूर्वा यांनी सामे या गाण्यावर धमाकेदार डान्स सादर केला आणि त्यावर राखीनी त्यांची प्रशंसा देखील केली. तर अमृता धोंगडे आणि विशाल निकम याने देखील परफॉर्मन्स सादर केला. आता कॅप्टन्सीसाठी घरात अजून एक कार्य पार पडणार आहे. त्याचं नाव आहे मीटर डाऊन. हेही वाचा - Samantha Ruth Prabhu: समांथा रुथ प्रभूची प्रकृती खालावली; उपचारांसाठी लंडन, अमेरिका नाही थेट गाठणार ‘हा’ देश या कार्यामध्ये स्पर्धकांना दोघांच्या टीममध्ये खेळायचं असून यांच्यासोबत घरात वाईल्ड कार्ड एंट्री घेतलेले स्पर्धक देखील खेळ खेळणार आहेत. या कार्यच नेतृत्व रोहित शिंदे करणार आहे. या कार्यादरम्यान मीरा जगन्नाथ आणि रोहित शिंदेमध्ये वाद होणार आहेत. मीरा आणि अक्षय एका टीममध्ये खेळणार असून त्यामध्ये रोहित मीराला बाद करतो. पण मीरा त्याचा आदेश नाकारते. करायचं तर दोघांना आउट कर नाहीतर मी आउट नाही होत जा असं म्हणत ती रोहितला चॅलेंज देते. तिला विशालही सपोर्ट देतो.
आता बिग बॉस सध्या सुट्टीवर असताना मीरा जगन्नाथ सोबत केलेला वाद रोहित शिंदेला महागात पडणार का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान बिग बॉस मराठीच्या घरातुन मागच्या आठवड्यात समृद्धी जाधव घराबाहेर पडली होती. आता तेजस्विनी लोणारीचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपला आहे. तेजस्विनीला एका टास्कदरम्यान हाताला गंभीर दुखापत झाली होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तेजस्विनीला घरातून एक्झिट घ्यावी लागली आहे. तेजस्विनीला निरोप देताना घरातील सदस्य भावुक झालेले पाहायला मिळाले. आता घरात पुढे काय घडणार ते येणाऱ्या काळात समजेल.
आता सध्या घरात चार वाईल्ड कार्ड एंट्री झाल्या आहेत. यामध्ये विशाल निकम, मीरा जगन्नाथ आणि आरोह वेलणकर हे तीन जुने सदस्य तर राखी सावंत या नवीन सदस्यांची एंट्री झाली आहे. त्यामुळे घरातील खेळाला नवीन रंगत आली आहे. आता घरातून तेजस्विनी कायमची बाहेर पडणार कि परतणार हे येणाऱ्या काळात समजेल.