बिग बॉस मराठी 4मध्ये सहभागी झालेला डॉ. रोहित शिंदे नुकताच घरातून बाहेर आला आहे. रोहित हा पेशानं डॉक्टर असला तरी त्याला मॉडेलिंगमध्येही रुची असल्यानं त्यानं अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. पण रोहित नेमका कोणता प्रकारचा डॉक्टर आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असले. जाणून घ्या याचं उत्तर. रोहितचं बीएमएस झालेलं आहे. रोहित आयसीयू इमर्जन्सी पेशन्ट्स पाहतो. हार्ट अटॅक, रोड अपघातात जखमी झालेल्या रुग्णांवर तो उपचार करतो. रोहितचं ठाण्यात स्वत:चं हॉस्पिटल आहे. तिथे तो सातत्यानं रुग्णांची सेवा करत असतो. बिग बॉसच्या घरात मेडिकल इमर्जन्सीच्या कधी आली होती का असं विचारल्यावर रोहित म्हणाला, हो यशश्रीच्या वेळी आली होती. तेव्हा मी मदत केली होती. तसंच रोहित म्हणाला, कोणत्याही टीममधला आहे म्हणून नाही तर एक माणूस म्हणून घरात जेव्हा केव्हा गरज पडली मी डॉक्टर म्हणून काम कर्तव्य पार पाडलं.