मुंबई, 09 जानेवारी : बिग बॉस मराठी चा चौथा सिझन काल अखेर संपला. नेहमीप्रमाणेच यंदाचा सिझन देखील चांगलाच गाजला. बिग बॉसच्या घरात यावेळी एक सो एक स्पर्धकांनी एंट्री घेतली. शिवाय यावेळी फेअर-अफेअरचा वाद देखील चांगलाच रंगला. हा शो ट्रॉलर्सच्या निशाण्यावर देखील आला. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा 08 जानेवारी रोजी रंगला. यंदाच्या बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता अक्षय केळकर ठरला. सध्या त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरु आहे. पण त्यासोबतच महाअंतिम सोहळ्यात एका गोष्टीने लक्ष वेधलं ती म्हणजे रुचिरा आणि रोहितची अनुपस्थिती. आता यामागे काय कारण आहे याचा उलगडा रुचिराने काल केलेल्या पोस्टमधून झाला आहे. बिग बॉस मराठीच्या घरात एकत्र एंट्री घेतलेलं पाहिलं जोडपं म्हणजे रुचिरा जाधव आणि रोहित शिंदे हे दोघे होते. बिग बॉसच्या घरात या दोघं एकमेकांना साथ देत आपापला खेळ खेळत होते. पण लवकरच दोघांमध्ये खटके उडू लागले. रुचिरानं घराबाहेर येताच त्याला सोशल मीडियावरून अनफॉलो केलं. तसंच त्याच्याविषयी स्पष्ट नाराजी व्यक्त केली. त्यानंतर या दोघांच्या नात्याचं पुढे काय होणार याची चाहत्यांना चिंता असताना दोघेही बिग बॉसच्या घरात पुन्हा एकत्र आले होते. बिग बॉस मराठी 4च्या ग्रँड फिनाले आधी प्रेक्षकांना पुन्हा सगळे सदस्य एकत्र घरात पाहायला मिळाले. या स्पर्धकांमध्ये रोहित रुचिरा सुद्धा एकत्र आले होते. बिग बॉसच्या घरात दोघांचेही गोड क्षण पाहायला मिळाले. हेही वाचा - Bigg Boss 4 Finale : नाद करायचा नाय! अखेर अक्षय केळकरने कोरलं बिग बॉस पर्व 4 च्या विजेतेपदवर नाव हे दोघे एकत्र आल्याने त्यांचे चाहते आनंदी होते. मात्र अजूनही या दोघांत काही आलबेल नसल्याचं रुचिराच्या पोस्टवरून समजत आहे. काल रात्री बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्यादरम्यान रुचिराने एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये तिने डायरीवर लिहिलेल्या भावना चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. तिने बिग बॉस विषयी बोलताना लिहिलंय कि, ‘हा शो माझ्यासाठी खूप महत्वाचा होता कारण इथे आपण खऱ्या आयुष्यात कसे असतो ते दिसतं.’
तिने रोहित आणि तिच्या नात्यात या शो दरम्यान काय बदल झाला तेही लिहिलं आहे. ती म्हणतेय कि, ‘जी गोष्ट मला सुदैवाने मिळाली होती ती सगळ्यात भयानक ठरली माझ्यासाठी. मला फक्त त्रास एका गोष्टीचा झाला कि मनासारखं खेळता नाही आलं, वागता नाही आलं. मला फक्त स्वतःचा विचार करायला जमलं नाही. खूप स्वप्न बघितली होती मी जी फक्त ‘माझ्यासाठी’ नव्हती.’ रुचिराने व्यक्त केलेल्या या भावनांमधून स्पष्ट समजतं आहे कि ती चांगलीच दुखावली गेली आहे.
घराबाहेर येताच रुचिरानं रोहितला इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केलं. यावरून बिग बॉसमुळे रोहित रुचिराच्या नात्यात दुरावा आलाय का? त्यांचं पुढे काय होणार असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला होता. मात्र बिग बॉसच्या घरात दोघांना पुन्हा एकत्र आलेले पाहून चाहते आनंदात होते. पण अजूनही या दोघांत काही ठीक नसल्याचं स्पष्ट दिसत आहे.