जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / BBM4 : वडिलांची बाईक तिच्या घरासमोर उभी करून...;किरण मानेंनी सांगितली पहिल्या प्रेमाची गोष्ट

BBM4 : वडिलांची बाईक तिच्या घरासमोर उभी करून...;किरण मानेंनी सांगितली पहिल्या प्रेमाची गोष्ट

किरण माने

किरण माने

अभिनेते किरण माने यांनी बिग बॉसच्या घरात त्यांच्या पहिल्या प्रेमाची झक्कास स्टोरी सांगितली आहे. त्यांची स्टोरी एकदा वाचाच.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 21 नोव्हेंबर : बिग बॉस मराठी च्या चौथ्या सीझनमधील एक तगडा स्पर्धक किरण माने . सध्या किरण माने घरातील सिक्रेट रूममध्ये आहेत. पण पहिल्या दिवसापासून किरण मानेंनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विकास आणि किरण मानेंच्या गप्पा तर प्रेक्षकांनी मागचे 50 दिवस पाहिल्याच आहेत. पण इतक वेळी कॅमेरा मागे किरण माने इतर स्पर्धकांशीही तितक्याच छान गप्पा मारतात. तडक फडक, स्पष्टवक्ते, आपल्या सातारी भाषेत प्रेक्षकांची मनं जिंकणारे किरण मानेंच्या पहिल्या प्रेमाची गोष्ट फार कमी जणांना माहिती असेल. स्वत: किरण मानेंनी इयत्ता सातवीमधील त्यांच्या प्रेमाची गोष्ट सांगितली आहे. बिग बॉसच्या घराच्या अंगणात किरण माने, विकास सावंत, समृद्धी आणि यशश्री मसुरकर यांच्या गप्पा रंगलेल्या असताना समृद्धीनं किरण मानेंना त्यांच्या पहिल्या प्रेमाविषयी विचारलं. तेव्हा किरण माने म्हणाले, ‘सातवीत होतो तेव्हा मला माझं पहिलं प्रेम मिळालं होतं. आता काही वर्षांनी आम्ही मेसेंजवर बोलायला लागलो. नंबर एक्सचेंज झालेत व्हॉट्स अँपवर बोलतो आम्ही. आता ती पुण्यात असते तिचं सगळं नीट सुरू आहे. एक दिवस आम्ही शाळेतले सगळे मित्र मैत्रीणी शोधून काढले आणि गेट टूगेदर केलं होतं.  तेव्हा तिचा नवरा आणि मुलगा आला होता. मी ही बायको मुलगी, मुलगा यांना घेऊन गेलो होतो’. हेही वाचा - ‘जाळ आणि धूर संगटच’; किरण मानेंच्या स्पेशल पॉवरमुळे बिग बॉसच्या घरात येणार नवं वादळ किरण माने पुढे म्हणाले,  ‘सातवीत असल्यापासून माझं तिच्यावर प्रेम होतं. माझ्या वडिलांची बाईक होती. त्यावेळी मी ती घेऊन जायचो आणि तिच्या घराबाहेर बंद पाडायचो. मग तिथेच बसून बराच वेळ बाईकचं कार्बोरेटर काढून साफ करत बसायचो’. यावर विकास, समृद्धी आणि यशश्री पोट धरून हसायला लागले.

पैज लावून मुलीला प्रपोज केलं  आणखी एक आठवून सांगत किरण माने म्हणाले,  ‘एकदा पैज लावून एका मुलीला प्रपोज केलं होतं. आम्ही क्रिकेट खेळायला जायचो तिथे एक मुलगी होती.  मी विकट किपिंगला उभा राहायचो आणि तिथून ती मुलगी अभ्यास करत समोर दिसायची. सगळ्यांनाच ती आवडायची. तिला कोण प्रपोज करणार. क्लास वरून आली की तिला प्रपोज करायचं अशी पैज लागली. जो प्रपोज करेल त्याला पार्टीला द्यायची अशी पैज लागली’.

News18लोकमत
News18लोकमत

‘मग ती आली मी तिला प्रपोज केलं. ती म्हणाली, ‘हो मी तुला बघते तिथे तू क्रिकेट खेळत असतोस ना’. त्यावर मी तिला बोललो, ‘तू हो की नाय ते सांग’. ती म्हणाली, ‘मी विचार करून सांगते’. ती निघून गेली इथे आमची पैज वगैरे झाली आम्ही आमच्या खेळाला लागलो आणि एक आठवड्यानं गल्लीतील एक मुलगा आला आणि म्हणाला, ‘किरण दादा इकडे ये. तिने तुला हो म्हणून सांगितलं आहे’.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात