मुंबई, 21 नोव्हेंबर : ‘बिग बॉस मराठी 4’ चा सीझन जसा जसा पुढे सरकतो आहे तसा तसा सदस्यांचा खरा चेहरा समोर येतोय. दिवसेंदिवस खेळ अधिक रंजक होत चालला आहे. शोमध्ये वादही दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसत आहे. त्यामुळे घरातील वातावरण सतत बदलत असल्याचं चित्र आहे. यासोबत एक एक सदस्य घरातून बाहेर पडत आहेत. नुकतीच घरातून टूकटूक राणीची म्हणजेच यशश्री मसुरकरची एक्झीट झाली आहे. त्यानंतर किरण मानें ना बिग बॉसने स्पेशल पॉवर दिली आहे. किरण मानेंना मिळालेल्या या स्पेशल पॉवरमुळे घरात नवा ट्विस्ट येणार आहे. कलर्स मराठीने नुकताच त्यांच्या इन्स्टाग्रामवर आजच्या एक भागाचा प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये दिसतंय की, किरण माने बिग बॉसने दिलेल्या सिक्रेट रुममध्ये बसले आहेत. ते त्या सिक्रेट रुममधून घरातील सदस्यांवर नजर ठेवत आहेत. घरातील सदस्य त्यांच्याविषयी काय काय बोलत आहेत हे ते पाहत आणि ऐकत आहेत. बिग बॉसने घेतलेला हा निर्णय प्रेक्षकांना चांगलाच आवडला आहे. या ट्विस्टमुळे घरातील समीकरणे बदलणार आहेत.
प्रोमो व्हिडीओवर चाहते भन्नाट कमेंट करताना दिसत आहेत. ‘एक नंबर ट्रीटमेंट. याला म्हणतात मास्टर माईंड किरण माने. कोंबडीला आनंद झाला किरण माने बाहेर गेलाय याचा, कोंबडी आणि पिल्ले खूश, जाळ आणि धूर संगटच, किरण माने चांगला प्लेअर आहे. वीक्या गोड बोलून गेम करतोय’, अशा अनेक कमेंट व्हिडीओवर येत असलेल्या पहायला मिळत आहेत.
दरम्यान, बिग बॉसच्या सदस्यांना किरण माने घराबाहेर पडले असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर किरण मानेंना घराबाहेर न काढता त्यांना एका सिक्रेट रुममध्ये ठेवण्यात आलं. आता किरण माने या सिक्रेट रुममधून सदस्यांवर नजर ठेवत आहेत. त्यांच्या मागे त्यांच्याविषयी कोण काय बोलतंय, कोण काय गेम करतंय, हे किरण माने त्यांच्या सिक्रेट रुममधून पाहत आहे. त्यामुळे किरण माने खेळातून बाहेर पडला असला तरी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला नाही.