जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / BBM 4: बिग बॉसच्या घरात ढसाढसा रडायला लागला अक्षय; नेमकं काय घडलं त्याच्यासोबत?

BBM 4: बिग बॉसच्या घरात ढसाढसा रडायला लागला अक्षय; नेमकं काय घडलं त्याच्यासोबत?

'बिग बॉस मराठी 4'

'बिग बॉस मराठी 4'

एरवी सगळ्यांसोबत भांडणारा अक्षय एका टास्कदरम्यान ढसाढसा रडला. काय घडलं नक्की पाहा

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 ऑक्टोबर :  ‘बिग बॉस मराठी 4’चा गाजावाजा सर्वत्र पहायला मिळत आहे. दिवसेंदिवस रंजक होत चाललेल्या शोमध्ये वादही दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसत आहे. त्यामुळे घरातील वातावरण सतत बदलत असल्याचं चित्र आहे. बिग बॉसच्या घरात कधी काय घडेल आणि कोणाचा कधी कोणावर पारा चढेल याचा काही नेमच नाही. नुकत्याच झालेल्या बिग बॉसच्या चावडीत महेश सरांनी किरण-विकासच्या नाटकाचा पर्दाफाश केला. याशिवाय मांजरेकरांनी अनेकांची शाळा घेतली. सध्या घरात स्पर्धक दिवाळी साजरी करत आहेत.  बिग बॉस मराठी च्या आजच्या भागात स्पर्धक घरात भाऊबीज साजरी करणार आहेत. समृद्धी आणि यशश्री या दोघी योगेशला राखी बांधणार आहेत. पण त्याचबरोबर स्पर्धकांना एका  टास्कला सामोरे जावे लागणार आहे. नुकताच याविषयी एक प्रोमो समोर आला आहे. त्यामध्ये स्पर्धकांना कुटुंबियांना बोलण्यासाठी एक टास्क करावे लागणार आहे. बिग बॉसच्या घरात स्पर्धकांना घरी व्हिडीओ कॉल  लावण्याची संधी मिळणार आहे. पण सदस्यांना कुटुंबियांना व्हिडीओ कॉल करण्यासाठी एकमेकांची मनधरणी करावी लागणार आहे. यादरम्यान घरातील काही स्पर्धक चांगलेच भावुक झालेले पाहायला मिळाले. या टास्कदरम्यान घरात नेहमी सगळ्यांवर आवाज चढवणारी अपूर्वा सदस्यांची मनधरणी करताना आईच्या आठवणीने रडायला लागली. ती म्हणाली, ‘‘माझी आई एकटीच राहते, मला तिला बघायला आवडेल’. त्यासोबतच विकासने सुद्धा आईसोबत व्हिडीओ कॉलवर बोलण्यासाठी सदस्यांना विनंती केली. हेही वाचा - लग्नानंतर पहिल्यांदाच कतरिना-सलमानची होणार नजरा-नजर; बिग बॉस 16 च्या मंचावर जुन्या आठवणी रंगणार? या दोघांसोबतच अक्षय केळकर सुद्धा घरच्यांच्या आठवणीने भावुक झाला आणि रडायला लागला. तो म्हणाला, ‘मला घरी बोलायचंय, मला माहित नाही आई बोलेल कि बाबा… पण त्या दोघांचे मतभेद आहेत…ते कधीच एकत्र येत नाहीत…एवढे बोलत अक्षय रडायला लागला. या सदस्यांचं बोलणं ऐकून इतर सदस्य सुद्धा भावुक झालेले पाहायला मिळाले. आता घरात कोणत्या सदस्याला घरच्यांसोबत व्हिडीओ कॉल  करण्याची संधी मिळते ते बघणं महत्वाचं ठरणार आहे.

जाहिरात

दरम्यान कलर्स मराठीच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये अक्षय आणि तेजस्विनी टास्क खेळताना दिसले. यादरम्यान दोघेही थोडे जवळ आलेले पहायला मिळत आहेत. तेवढ्यात अक्षय म्हणतो की, आणि अशाप्रकारे मला माझा पार्टनर सापडला. मी तुझा बाजीराव आणि तू माझी मस्तानी. यावर तेजस्विनी म्हणते खरंच प्रेमात पडशील हा. अक्षय आणि तेजस्विनीच्या या व्हिडीओनं सध्या सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. तेजस्विनी आणि अक्षयमध्ये फुलतोय का प्रेमाचा गुलमोहर? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, सोशल मीडियावर सर्वत्र ‘बिग बॉस मराठी सीझन 4’ ची चर्चा पहायला मिळत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस बिग बॉसचा खेळ रंजक होत चालल्याचं दिसतंय. यंदा कोणता स्पर्धक बिग बॉसची ट्रॉफी घरी नेणार हे याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात