मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss Marathi 3 च्या घरात मराठीतील 'हा' प्रसिद्ध अभिनेता करणार वाईल्ड कार्ड एन्ट्री

Bigg Boss Marathi 3 च्या घरात मराठीतील 'हा' प्रसिद्ध अभिनेता करणार वाईल्ड कार्ड एन्ट्री

एका वाईल्ड कार्ड स्पर्धकाची बिग बॉसच्या घरात एन्ट्री होईल. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमधून एक पुरुष स्पर्धक वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेत असल्याचं दिसत आहे.

एका वाईल्ड कार्ड स्पर्धकाची बिग बॉसच्या घरात एन्ट्री होईल. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमधून एक पुरुष स्पर्धक वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेत असल्याचं दिसत आहे.

एका वाईल्ड कार्ड स्पर्धकाची बिग बॉसच्या घरात एन्ट्री होईल. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमधून एक पुरुष स्पर्धक वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेत असल्याचं दिसत आहे.

  मुंबई. 09 ऑक्टोबर : सध्या सगळीकडे बिग बॉस मराठीची चर्चा आहे. सर्व स्पर्धक बिग बॉस  मराठीच्या (Bigg Boss Marathi 3)  घरात आता चांगले रमलेले दिसत आहे. घरात आता दोन ग्रुप देखील झालेले दिसत आहे. प्रत्येक जण या घरात राहण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी स्पर्धक टास्क देखील पूर्ण मेहनतीने करताना दिसत आहेत. अशातच आता या घऱात एक नवीन सदस्य  ( New Wild Card Entry) येणार आहे ज्यामुळे बिग बॉस मराठीच्या घऱाता काही बदल होणार का असा देखील प्रश्न पडला आहे. आता हा येणारा सदस्य  ( New Wild Card Entry Name कोण मोठा अभिनेता आहे की अभिनेत्री आहे की इतर कोणत्या क्षेत्रातील आहे असा प्रश्न पडणे साहजिक आहे. आज बिग बॉस मराठीच्या घरात विकएन्ड चावडी रंगणार आहे. यात एका वाईल्ड कार्ड स्पर्धकाची बिग बॉसच्या घरात एन्ट्री होईल. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमधून एक पुरुष स्पर्धक वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेत असल्याचं दिसत आहे.बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिजनला सुरुवात होऊन काहीच दिवस झालेले असताना आता घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे त्यामुळे घरातील सदस्यांवर याचा परिणाम कसा होणार याची उत्सुकता लागली आहे. वाचा : 'महाकाली' रूपात दिसली 'आई कुठे...'फेम रुपाली भोसले! अभिनेत्रीचं होतंय कौतुक सध्या या वाईल्ड कार्ड स्पर्धकाची जोरदार चर्चा, तो कोण आहे व काय करतो आहे अशी रंगली आहे. अभिनेता आदिश वैद्य ( Adish Vaidya) हा वाईल्ड कार्ड स्पर्धक असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. प्रोमोवरुनही अनेकांनी हा अंदाज बांधला आहे. प्रेक्षकांनी या प्रमोच्या खाली कमेंट करून हा आदिश असल्याचे सांगितले आहे.
  कोण आहे हा  आदिश वैद्य ? विविध मराठी आणि हिंदी मालिकांमधून प्रसिद्ध असलेला आदिश हा आता बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एन्ट्री घेत असल्याच्या चर्चांना उधाण आल आहे. 'गुम है किसीके प्यार में' या हिंदी मालिकेत आदिश सध्या महत्त्वाची भूमिका साकारत होता. मात्र नुकतीच त्याने या शोमधून एक्झिट घेतल्याचं देखील समोर आल आहे. अदिश नेहमी रेवती लेलेसोबतच्या रिलेशनमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. दोघेही एकमेंकासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. वाचा :इंडियन आयडॉल फेम पवनदीप-अरुणिताने गुपचूप उरकलं लग्न? Wedding फोटो होतोय VIRAL आता हा वाईल्ड कार्ड स्पर्धक आदिशच आहे की कोणी दुसरा हे आजच्या चावडीच्या भागात समोर येणार आहे. याशिवाय चावडीवर यंदा महेश मांजरेकर कुणाची शाळा घेतात हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bigg boss, Bigg boss marathi, Marathi entertainment

  पुढील बातम्या