आज चैत्र नवरात्रोत्सवाचा तिसरा दिवस आहे. आजच्या दिवशी 'चंद्रघंटा' देवीची पूजा करण्यात येते. या देवीच्या कपाळावर घंटेच्या आकारात अर्धचन्द्र कोरलेला दिसतो. त्यामुळे ही देवी अत्यंत तेजस्वी दिसते. म्हणून देवीला चंद्रघंटा देवी म्हटलं जातं.
आज सर्वत्र ग्रे कलरचे कपडे परिधान केले जात आहेत. तसेच या देवीच्या हातात धनुष्य, तलवार, बाण अशी विविध शस्त्रे आहेत. या शस्त्रांनीचं देवीने राक्षसांचा वध केल्याचं म्हटलं जात.
आज मराठमोळी अभिनेत्री रुपाली भोसलेने देवी चंद्रघंटाचं रूप घेतलं आहे. रुपालीला या रूपात ओळखणंही कठीण झालं आहे. रुपालीने आपले हे फोटो सोशल मीडियावर शेअर करत सर्वांनाच शुभेच्छा दिल्या आहेत.
रुपाली भोसले सतत विविध रूपात फोटोशूट करताना दिसून येते. मात्र हे फोटोशूट थोडं खास आहे. देवीच्या रूपातील रुपालीने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे.
रुपाली भोसले 'आई कुठे काय करते' या मराठी मालिकेतून घराघरात पोहोचली आहे. यामध्ये तिने संजना ही नकारात्मक भूमिका साकारली आहे. तरीही तिला रसिक प्रेक्षकांच प्रचंड प्रेम मिळत आहे.
याआधी रुपाली भोसले बिग बॉस मराठीमध्येसुद्धा दिसून आली होती. बिग बॉसनेसुद्धा तिला प्रचंड लोकप्रियता दिली होती. रुपाली सोशल मीडियावरसुद्धा मोठी ऍक्टिव्ह असते.