मुंबई, 9ऑक्टोबर- टीव्हीवरील रिएलिटी शो 'इंडियन आयडॉल १२' (Indian Idol 12) अत्यंत लोकप्रिय झाला होता. या सीजनमध्ये एक रोमँटिक केमिस्ट्री सर्वांना दाखवण्यात आली होती. ती म्हणजे स्पर्धक पवनदीप राजन (Pavandeep Rajan) आणि अरुणिता कांजीलाल (Arunita Kanjilal) यांची. या जोडीने सर्वांनाच भुरळ घातली होती. ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकताच सोशल मीडियावर या दोघांचा एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये या दोघांनी चक्क लग्न केल्याचं दिसत आहे. कारण दोघेही अगदी नवरा-नवरीच्या वेशात दिसून येत आहेत.
View this post on Instagram
सोनी वाहिनीवर 'इंडियन आयडॉल' हा सिंगिंग सो आपल्या भेटीला येत होता. नुकताच या शोचा हा १२ वा सीजन पार पडला आहे. यावेळी सर्वच स्पर्धक आणि परीक्षकांनी धम्माल केली होती. हा सीजन सर्व सीजनपेक्षा दीर्घकाळ चालला होता. या शोमधील स्पर्धकांनी आपल्या आवाजाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं होत. तसेच शोमध्ये स्पर्धक असणाऱ्या अरुणिता कांजीलाल आणि पवनदीप राजन यांच्यामध्ये लव्ह केमिस्ट्री दाखवण्यात आली होती. अनेकांना ही जोडी मोठ्या प्रमाणात पसंतदेखील पडली होती. शोमध्ये दाखवण्यात येत असलेल्या या लव्ह केमेस्ट्रीवरून अनेकदा वादही झाले होते. शोच्या टीआरपी साठी प्रेक्षकांच्या भावनांशी खेळलं जात असल्याचे आरोप लावण्यात येत होते. हे काहीही असलं तरी या दोघांच्या चाहत्यांना त्यांची जोडी फारच पसंत होती.
(हे वाचा:Bigg Boss 15:बिग बॉसच्या घरात मायशा अय्यर-ईशान सेहगलने केलं Kiss! VIDEO पाहून...)
काही दिवसांपूर्वी हा शो संपला आहे. मात्र तरीसुद्धा अरुणिता आणि पवनदीप एकेमकांच्या सोबत दिसून येतात. सतत सोशल मीडियावर हे दोघे एकेमकांसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. त्यामुळे चाहत्यांमध्ये या दोघांबद्दल अधिक उत्सुकता वाढली आहे. तसेच तुम्हाला सांगू शोमध्ये या दोघांनीही आपल्यामध्ये फक्त मैत्री असल्याचं स्पष्ट केलं होतं. बाकी सर्व काही शोमध्ये मसाला आणण्यासाठी केलं जात असल्याचं म्हटलं होतं.
(हे वाचा:Bigg Boss OTT फेम उर्फी जावेद करतेय वाढदिवसाची प्रतीक्षा! कारणही आहे खास)
मात्र नुकताच या दोघांच्या फॅन पेजवर या दोघांचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. हा फोटो पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. कारण या फोटोमध्ये दोघांनी लग्न केल्याचं दिसत आहे. फोटोमध्ये अरुणिता लाल रंगाच्या लेहेंग्यामध्ये तर पवनदीप ट्रॅडिशनल शेरवानीमध्ये दिसून येत आहे. मात्र हा फोटो पाहून युजर्सनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत, तर काहींनी चांगलं एडिटिंग असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी तुम्ही खर्च लग्न करणार आहात का असंदेखील विचारलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Indian idol