मुंबई, 14 नोव्हेंबर: बिग बॉस मराठीच्या **(Bigg Boss Marathi 3 )**घरातून प्रत्येक आठवड्याला एक स्पर्धक बाहेर जात असतो. या आठवड्यात नुकतीच वाईल्ड कार्ड एंट्री केलेलीनिथा शेट्टी घरातून बाहेर झाली आहे. यापूर्वी देखील वाईल्ड कार्ड एंट्री केलेला आदिश वैद्य देखील दोन आठवड्यातच घरातून बाहेर पडला होता. आता देखील निथा शेट्टी घऱातून बाहेर पडली आहे. या आठवड्यात नॉमिनेशनमध्ये आलेल्या सदस्यांमध्ये काल जय, विशाल, आणि दादूस सेफ आहेत असे महेश मांजरेकर यांनी सांगितले. आता नीथा, सोनाली, उत्कर्ष आणि विकास या चौघां जणांमधून आज कोणाला घराबाहेर जावे लागेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक होते. नीथा आणि सोनाली हे दोन सदस्य डेंजर झोनमध्ये आले. महेश मांजरेकरांनी सांगितले. नीथा शेट्टी – साळवी हिला या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले. कोण आहे नीथा शेट्टी? अभिनेत्री निथा शेट्टीबद्दल सांगायचे तर, नीता ‘धूंड लेगी मंझिल हमें’ या टीव्ही शोमधील ‘आरती’ या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. ‘एक दिन अचानक’, ‘घर की लक्ष्मी बेटियां’, ‘प्यार की ये एक कहानी’, ‘ससुराल सिमर का’, ‘सियासत’, ‘सियासत’, ‘एमटीव्ही बिग एफ’ यांसारख्या लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्येही ती दिसली आहे. तिने अनेक मराठी आणि बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. वाचा : कंगना रणौतनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल विक्रम गोखलेंच मोठं विधान हिंदी मालिका विश्वात नाव कमावणाऱ्या अभिनेत्री निथा शेट्टीने मराठी चित्रपटातही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. या अभिनेत्रीने सुबोध भावे यांच्यासोबत ‘फुगे’ आणि ‘तुला कळणार नाही’ या मराठी चित्रपटातही काम केले आहे.
निथा शेट्टी शेट्टी घरातून बाहेर पडली आहे. यावरून एकच लक्षात येते की, आतापर्यत ज्या वाईल्ड कार्ड एंट्री झाल्या त्याला प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. कदाचित प्रेक्षकांना त्यांचा खेळ आवडलेला नसावा. त्या तुलनेत खेळात सुरूवातीपासून असणाऱ्या स्पर्धकांचे आता एकमेकांसोबत चांगली मैत्री झाली आहे. यासोबत घरात ग्रुप देखील पडले आहेत. आता घरातील खेळ या ग्रुपभोवती फिरत असतो. टास्क दरम्यान अनेकवेळा सदस्य एकमेंकासोबत भिडतात. त्याचप्रमाणे मैत्रिचेही दर्शन होत असते. वाचा : स्वातंत्र्य भीक मिळाल्याच्या कंगनाच्या विधानाला विक्रम गोखलेंचा पाठिंबा नुकताच विशाल कॅप्टन व्हावा म्हणून विकास पाटीलने टक्कल केल. यावेळी त्यांच्यातील खरी मैत्रिचे दर्शन घडलं. सोशल मीडियावर या दोघांच्या मैत्रिचे कौतुक झालं. सोनाली आणि मीनल असेल किंवा गायत्री आणि मीरा असेल यांच्यात देखील अशी मैत्री पाहण्यास मिळते. आता निता शेट्टीच्या जाण्याचा खेळावर व शोवर काय परिणाम होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. कसा असणार नवा आठवडा ? कोणते सदस्य होणार नॉमिनेट ? कोणकोणते नवे टास्क घरामध्ये रंगणार ? जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी आपल्या कलर्स मराठीवर.