Bigg Boss Marathi 2ः शिव- किशोरीमध्ये रंगणार मनोरा विजयाचा कार्य

Bigg Boss Marathi 2ः शिव- किशोरीमध्ये रंगणार मनोरा विजयाचा कार्य

Bigg Boss Marathi 2 शिव आणि किशोरी मध्ये कोण बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन होईल हे पाहणं औत्सुक्याचं असेल.

  • Share this:

मुंबई, 24 जून- बिग बॉस मराठीच्या घरामधून काल विद्याधर जोशी बाहेर पडले.. आज घरामध्ये नवीन कॅप्टन निवडला जाणार आहे. बिग बॉस आज सदस्यांवर ‘मनोरा विजयाचा’ हे कार्य सोपवण्यात येणार आहेत. किशोरी शहाणे आणि शिव ठाकरे यांच्याक हे कार्य रंगणार आहे. त्यांना समर्थकांकडून आपआपले ठोकळे जमवून त्याचा मनोरा तयार करायचा आहे. तसेच तो मनोरा समर्थकांच्या मदतीने तो टिकवून ठेवणे आवश्यक आहे. कार्याच्या शेवटी ज्या उमेदवाराचा मनोरा दुसऱ्या उमेदवाराच्या मनोऱ्यापेक्षा मोठा आणि सुस्थितीत दिसेल तो उमेदवार या आठवड्यामध्ये घराचा नवीन कॅप्टन म्हणून घोषित होईल.

बॉलिवूडमध्ये फक्त हिटच नाही तर फिटही आहे सलमान खान, हा घ्या पुरावा!

टास्क दरम्यान सदस्यांमध्ये भांडण, वादविवाद हे तर होणारच आहेत. टास्क दरम्यान माधव आणि विणामध्ये पुन्हा एकदा वाद रंगणार आहे. शिव आणि किशोरी मध्ये कोण बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन होईल हे पाहणं औत्सुक्याचं असेल. तसेच सुरेखा पुणेकर यांनी सगळ्या पुरुषांना स्वावलंबी व्हा आणि स्वयंपाक करायला शिका असा सल्ला दिला. त्याचं झालं असं की, घरात सगळे पुरुष मिळून स्वयंपाक करणार आहेत, त्यामुळे घरातील बायकांना आज आराम मिळणार आहे.

...म्हणून अमिताभ बच्चन यांच्यासोबत फोटो काढल्यावर ट्रोल झाल्या जया

यावरूनच सुरेखाताई सगळ्या पुरूषांना संदेश देत म्हटलं की, स्वयंपाकाबद्दल अडाणी राहू नका, स्वयंपाक शिका म्हणजे घरातील स्त्रीला बाहेर जाता येईल, मज्जा करता येईल. कुठलाही पुरुष कितीही कष्ट करत असला तरीदेखील त्याला जेवणातली एखादी गोष्ट तयार करता आलीच पाहिजे. भूक लागली तर स्वत: करून खाऊ शकतो.

Sunny Leone आता हिंदी सोडून भोजपुरी शिकतेय सनी लिओनी, VIRAL VIDEO

VIDEO: विदर्भ, मराठवाड्यात मान्सूनची एन्ट्री, मुंबईकडे फिरवली पाठ

First published: June 24, 2019, 3:18 PM IST

ताज्या बातम्या