मुंबई, 07 जून- बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानच्या भारत सिनेमाने पहिल्याच दिवशी अफलातून कमाई केली. याचसाठी सलमानने ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांचे आभार मानले. सिनेमात राष्ट्रगीताच्या सीनवेळी प्रेक्षक उभे राहिले यासाठीही त्याने प्रेक्षकांचे आभार मानले. तो म्हणाला की, याहून मोठा देशाचा सन्मान कुठला असूच शकत नाही. राष्ट्रगीताला दिलेल्या सन्मानासाठी सगळ्यांना ‘जय हिंद’.
ईदच्या दिवशी भारत सिनेमाने सगळे रेकॉर्ड मोडत जोरदार गल्ला कमावला. भारत- दक्षिण आफ्रिकेचा वर्ल्ड कप सामना असूनदेखील सिनेमाने पहिल्या दिवशी ४२.३ कोटी रुपये कमावले. दिग्दर्शक अली अब्बास जफरचा सलग ३०० कोटींची कमाई करणारा हा तिसरा सिनेमा असेल. यासोबतच कमी वयात सलग तीन सिनेमे सुपरहिट सिनेमा देणारा दिग्दर्शकचा रेकॉर्डही त्याच्या नावावर जमा झाला आहे.
हे आहेत बॉलिवूडच्या 5 सुपरस्टारचे बॉडीगार्ड, त्यांचा पगार वाचून तुम्हीही व्हाल थक्क
Big thk u sabko fr giving sabse bada opening mere career ka par what made me the happiest & proudest is ki during a scene in my film jab national anthem is recited ev1 stood up as a mark of respect. There could be no bigger respect for our country than this... Jai Hind🙏 #Bharat
— Salman Khan (@BeingSalmanKhan) June 6, 2019
Bharat Review : सलमान 'आजोबां'चं काम फर्स्टक्लास पण... मिळालेत 'इतके' स्टार
याशिवाय राजकुमार हिरानी यांच्याकडेही ३०० कोटींहून अधिक कमाई केलेले संजू आणि पीके हे दोन सिनेमे आहे. अली अब्बासने भारत सिनेमात सलमानला एका वेगळ्याच पद्धतीने प्रेक्षकांसमोर आणलं आहे. विशेष म्हणजे सलमान आणि कतरिनाच्या अभिनयाची त्यांच्या चाहत्यांमध्ये कमालिची उत्सुकता होती. त्यामुळे अनेकांनी सिनेमाचं प्रीबुकिंगही केलं होतं.
दुसरा सर्वात जास्त कलेक्शन करणारा सिनेमा-
२०१८ मध्ये आलेल्या ठग्ज ऑफ हिंदोस्तानने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ५० कोटींचा गल्ला कमावला होता. हिंदी सिनेमांच्या इतिहासात भारत हा पहिल्या दिवशी सर्वाधिक गल्ला कमावणारा दुसरा सिनेमा ठरला आहे. तर दुसरीकडे असेही काही प्रेक्षक आहेत ज्यांना हा सिनेमा अजिबातच आवडला नाही. स्वयंघोषीत सिनेसमीक्षक कमाल राशिद खान (केआरके) म्हणाला की, ‘भारतचा अत्याचार संपला. हा या दशकातला सर्वात वाईट सिनेमा आहे. झीरो, ठग्ज ऑफ हिंदोस्तान, ट्यूबलाइट, रेस हे सिनेमा भारतपेक्षा खूपच बरे होते.’
सलमानचा ‘दबंग’ अवतार, भरगर्दीत स्वतःच्याच बॉडीगार्डच्या कानशिलात लगावली, Video Viral
पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे तीनतेरा; चहूबाजूंनी पाकिस्तानची कोंडी