अडीच वर्षांच्या मुलीच्या बलात्कारावर चिडलं बॉलिवूड, आरोपीला फाशीच्या शिक्षेची केली मागणी

अडीच वर्षांच्या मुलीच्या बलात्कारावर चिडलं बॉलिवूड, आरोपीला फाशीच्या शिक्षेची केली मागणी

अलीगढमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. एका अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची निघृण हत्या करण्यात आली.

  • Share this:

मुंबई, 07 जून- अलीगढमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. एका अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची निघृण हत्या करण्यात आली. मुलीवर अत्याचार करण्यात आले नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला लवकरात लवकर मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी अशी मागणी अनेकांनी केली आहे.

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने लिहिले की, ‘अतीशय चीड आणणारी ही घटना आहे. एवढी क्रूरता करण्याचा कोणी विचार तरी कसं करू शकते.’ अभिनेत्री सनी लिओनीने आपलं मत मांडत मुलीची माफीही मागितली. ती अशा जगात जन्माला आली जिकडे लोक माणुसकी विसरले आहेत. सनी या घटनेमुळे अस्वस्थ झाली असून समाजाच्या या परिस्थितीचा तिने स्वतःला दोष देत Iamsorry असंही म्हटलं.

सिनेमात राष्ट्रगीतावेळी हॉलमध्ये उभे राहिल्याबद्दल सलमानने मानले आभार, म्हणाला ‘जय हिंद’

World Cup दरम्यान रिअल हिरोंसोबत व्हायरल झालेले रणवीर सिंगचे फोटो तुम्ही पाहिलेत का?

अभिनेत्री सोनम कपूरनेही ट्विटरच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त केलं. सोनम म्हणाली की, ‘जे या मुलीसोबत झालं ते फारच दुःखद आहे. या प्रकरणाला आपआपसातलं वैर मिटवण्यासाठीचा वापर करू नका.’ बॉलिवूडमधून आयुष्याम खुराना, अर्जुन कपूर, अनुपम खेर, रितेश देशमुख यांसारख्या कलाकारांनी या घटनेची निंदा केली.

हे आहेत बॉलिवूडच्या 5 सुपरस्टारचे बॉडीगार्ड, त्यांचा पगार वाचून तुम्हीही व्हाल थक्क

काय आहे पूर्ण प्रकरण-

अलीगढमधील ही घटना असून ३१ मे रोजी बूढा गावातील एका बेपत्ता मुलीचा मृतदेह गावाच्या बाहेर कचऱ्याच्या पेटीत मिळाला. मुलीवर बलात्कार करून नंतर तिची निघ्रूण हत्या करण्यात आली. मात्र मुलीवर बलात्कार झाला की नाही याबद्दल कोणतीही माहिती पोलिसांनी दिलेली नाही. या प्रकरणात एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून जुनी उधारी चुकवली नाही म्हणून त्या व्यक्तीने मुलीची हत्या केल्याचं म्हटलं जात आहे.

रणबीर-आलीया या ठिकाणी करणार डेस्टिनेशन वेडिंग?

First published: June 7, 2019, 1:11 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading