जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO- शाहरुख खानने चक्क गाडीच्या छतावर चढूनच चाहत्यांना दिलं सरप्राइज

VIDEO- शाहरुख खानने चक्क गाडीच्या छतावर चढूनच चाहत्यांना दिलं सरप्राइज

VIDEO- शाहरुख खानने चक्क गाडीच्या छतावर चढूनच चाहत्यांना दिलं सरप्राइज

ईदच्या दिवशी शाहरुख आपल्या लहान मुलासोबत अब्रामसोबत मन्नतच्या बाल्कनीतून चाहत्यांना अभिवादन करायला आला होता, त्यावेळी त्याच्यासोबत डेविडही उपस्थित होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 07 जून- बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानने आपल्या चाहत्यांसाठी गुरुवारी एक खास सरप्राइज दिलं. शाहरुखने त्याचं घर मन्नतच्या समोर गाडीच्या छतावर चढून त्याला पाहायला आलेल्या चाहत्यांना खास भेट दिली. किंग खानला असं करताना पाहून त्याच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. सगळेच त्यावेळी शाहरुखच्या नावाचा जप करत वी लव्ह यू शाहरुख म्हणत होतं. शाहरुख सध्या हॉलिवूड होस्ट आणि विनोदवीर डेविड लेचरमॅनच्या नेटफ्लिक्स शो ‘माय नेक्स्ट गेस्ट नीड्स नो इंट्रोडक्शन’ या शोच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. शाहरुख गेल्या महिन्यात न्यूयॉर्कमध्ये जाऊन त्याचा भाग चित्रीत करून आला आहे. दरम्यान, डेविडच्या शोचा एक कॅमेरामन ईदच्या दिवशी मन्नतच्या बाहेर चाहत्यांची आणि शाहरुखची भेटीचे क्षण टिपताना दिसला होता. अडीच वर्षांच्या मुलीच्या बलात्कारावर चिडलं बॉलिवूड, आरोपीला फाशीच्या शिक्षेची केली मागणी

    जाहिरात

    World Cup दरम्यान रिअल हिरोंसोबत व्हायरल झालेले रणवीर सिंगचे फोटो तुम्ही पाहिलेत का? ईदच्या दिवशी शाहरुख आपल्या लहान मुलासोबत अब्रामसोबत मन्नतच्या बाल्कनीतून चाहत्यांना अभिवादन करायला आला होता, त्यावेळी त्याच्यासोबत डेविडही उपस्थित होता. एवढंच नाही तर शाहरुखने चाहत्यांना भेटतानाचा एक सेल्फी व्हिडिओही शेअर केला. यात त्याने शाहरुखने चाहत्यांचे भरभरून प्रेम आणि पाठिंबा दिल्याबद्दल आभारही मानले. शाहरुखच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, २०१८ मध्ये आनंद एल राय दिग्दर्शित झीरो सिनेमात तो दिसला होता. या सिनेमात त्याच्यासोबत अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका होत्या. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा दणदणीत आपटला होता. सध्या शाहरुख कोणत्याच सिनेमाच्या कथेवर काम करत नसून आपला जास्तीत जास्त वेळ घरच्यांसोबत घालवत आहे. सिनेमात राष्ट्रगीतावेळी हॉलमध्ये उभे राहिल्याबद्दल सलमानने मानले आभार, म्हणाला ‘जय हिंद’ रणबीर-आलीया या ठिकाणी करणार डेस्टिनेशन वेडिंग?

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात