जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / महाराष्ट्रातच मराठी सिनेमांना हक्काचे थिएटर्स,स्क्रीन्स का नाही? सद्यस्थितीवर उत्कर्षचा सवाल

महाराष्ट्रातच मराठी सिनेमांना हक्काचे थिएटर्स,स्क्रीन्स का नाही? सद्यस्थितीवर उत्कर्षचा सवाल

उत्कर्ष शिंदे

उत्कर्ष शिंदे

अभिनेता आणि गायक उत्कर्ष शिंदेनं महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या मराठी सिनेमाच्या गळचेपीवर भाष्य केलंय. पाहा अभिनेता काय म्हणालाय.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 22 नोव्हेंबर : अभिनेता ललित प्रभाकर प्रमुख भूमिकेत असलेला आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित सनी हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. मात्र सिनेमा प्रदर्शित होताच सिनेमाच्या स्क्रिनिंगचा प्रश्न उपस्थित झाला. आधीच मराठी सिनेमांना थिएटरमध्ये मिळत असलेलं दुय्यम दर्जाच स्थान हा मुद्द असताना आता मराठी सिनेमाचे शो रद्द केले जात आहे. सनी सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी काढलेल्या तिकिटाचे पैसे त्यांना परत देऊन थिएटर व्यवस्थापनानं शो रद्द केल्याची घटना घडली. यावर हेमंत ढोमेनं रद्द झालेल्या तिकिटाचे फोटो शेअर करत पोस्ट लिहित खंत व्यक्त केली. मराठी सिनेमाच्या सुरू असलेल्या गळचेपीवर अनेक जण भाष्य करत आहेत. यातच आता बिग बॉस फेम अभिनेता गायक उत्कर्ष शिंदेनं पोस्ट शेअर करत सद्यपरिस्थितीवर रोखठोक भाष्य केलं आहे. उत्कर्ष शिंदे सोशल मीडियावर सक्रीय असतो. मराठी सिनेमाबाबत घडलेल्या या घटनेनंतर त्यानं पोस्ट शेअर करत म्हटलंय, ‘आज मराठी सिनेमा ला बर्बरतेतून समृद्धीच्या वाटेवर आणायच असेल तर समानतेचि वागणूक मिळायलाच हवी’. पुढे त्यानं अभिनेते दादा कोंडके यांचं उदाहरण देत म्हटलंय, ‘अद्वितीय महान कलाकार दादा कोंडके यांच्या चित्रपटांना त्या काळी चित्रपटगृह मिळाली नव्हती बहुदा मुद्दाम गळचेपीच मराठी चित्रपटाची करायचा मनसुबा काहींचा तेव्हा होता. तोच प्रश्न तिच वेळ तेच विचार तिच कुचंबणा तिच डावलण्याची मानसिकता आजही तोंड वर काढतीये’. हेही वाचा -  ‘महाराष्ट्रात मराठी चित्रपटांची गळचेपी…’; मराठी सिनेमांवर होणाऱ्या अन्यायावर भडकला Hemant Dhome

जाहिरात

उत्कर्षनं पुढे लिहिलंय, ‘मराठी चित्रपट बनवताना किती कष्टाने सर्व जण आपल सर्व काही झोकून देत उत्तम चित्रपट तयार करायचा प्रयत्न करतायेत. पण अंततः प्रदर्शनास हक्काचे चित्रपटगृह, मुबलक वेळ, स्क्रीन्स का महाराष्ट्रातच मराठी चित्रपटांना दिली जात नाहीये?, असा सवाल त्यानं केलाय. पोस्टमध्ये शेवटी लिहिलात उत्कर्षनं सर्वांना आवाहन केलंय, त्यानं म्हटलंय, ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या ओळी फक्त बोलण्यपुरत्या नसाव्यात किमान एकमेकांसाठी उभे राहूया. एकमेकांचा आवाज बनूया, सोबतीने संघटीत होत आपले हक्क मिळवूया’.

News18लोकमत
News18लोकमत

उत्कर्षच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचं झालं तर उत्कर्ष सध्या ज्ञानेश्वर माऊली या मालिकेत संत चोखामेळांची भूमिका साकारत आहे. अभिनेता म्हणून त्यानं या मालिकेतून पदार्पण केलं आहे. तसंच वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमात उत्कर्ष महत्त्वाच्या भूमिकेत असून नुकतीच सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. सिनेमासाठी उत्कर्ष जोरदार मेहनत घेत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात