सिनेमात अभिनेता ललित प्रभाकर सनीच्या प्रमुख भूमिकेत आहे. शिवाय अभिनेता चिन्मय मांडलेकर, क्षिती जोग हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत.
महाराष्ट्राचा लाडका चॉकलेट बॉय ललित प्रभारकरला पाहण्यासाठी तरुणींनी थिएटरमध्ये गर्दी केली होती. ललित थिएटरच्या बाहेर येताच तरुणींनी त्याच्याभोवती गराडा घातला.