मुंबई, 03 नोव्हेंबर : छत्रपती शिवाजी महारांजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा नवा सिनेमा पुढच्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित
‘वेडात मराठे वीर दौडले सात’
या सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे
आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थित सिनेमाची घोषणा करण्यात आली. महेश मांजरेकरांचा आतापर्यंतचा हा सर्वात बिग बजेट सिनेमा असणार आहे. सिनेमात अभिनेता अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत. महाराजांच्या त्या सात शूर वाघांची गोष्ट सांगणाऱ्या या सिनेमात मराठी सिनेसृष्टीतील सात प्रसिद्ध चेहरे दिसणार आहेत. त्यातील तीन चेहरे हे
बिग बॉस मराठी
मधील आहेत. वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमात
अक्षय कुमार
बरोबर मराठमोळे तगडे कलाकार दिसणार आहेत. बिग बॉस मराठी 3चा विजेता अभिनेता विशाल निकम सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. त्याचप्रमाणे गायक अभिनेता उत्कर्ष शिंदे आणि जय दुधाणे देखील सिनेमात दिसणार आहे. उत्कर्ष आणि जय या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. तिघांच्या एंट्रीनंतर चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. हेही वाचा -
Vedat Marathe Veer Daudale Sat : अक्षय कुमार महाराजांच्या भूमिकेत; कोण आहेत ते सात मावळे? पाहा
बिग बॉस मराठी 3चा विजेता अभिनेता विशाल निकम चंद्राजी कोठार यांची भूमिका साकारणार आहे. बिग बॉस नंतर विशालला मिळालेला सर्वात मोठा ब्रेक आहे. विशालनं या आधी अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या त्याची आई मायेचं कवच ही मालिका सुरू आहे. तसंच त्यानं याआधी साता जन्माच्या गाठी, दख्खनचा राजा ज्योतिबा सारख्या मालिकेत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.
तर बिग बॉसच्या घरातील मास्टरमाइंड म्हणून ज्याला ओळख मिळाली असा गायक आणि आता झालेला अभिनेता उत्कर्ष शिंदे वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. उत्कर्षनं सोनी मराठीवरील ज्ञानेश्वर माऊली मालिकेत संत चोखामेळांची भूमिका करत अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. सिनेमात सूर्याजी दांडकर यांच्या भूमिकेत उत्कर्ष शिंदे दिसणार आहे.
बिग बॉसमधील तिसरा आघाडीची स्पर्धक जय दुधाणे देखील आता अभिनेता झाला आहे. स्लिट्सविला त्यानंतर बिग बॉस आणि आता थेट मांजरेकरांच्या सिनेमात काम करण्याची संधी जयला मिळाली आहे. जय दुधाणे सिनेमात तुळजा जामकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
जय उत्कर्ष आणि विशाल यांच्याबरोबर अभिनेते प्रवीण तरडे सिनेमात प्रतापराव गुजर, हार्दीक जोशी मल्हारी लोखंडे, सत्या मांजरेकर दत्ताजी पागे, विराट मडके जिवाजी पाटील यांची भूमिका साकारणार आहे.