जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नाराज बच्चू कडू यांना शिंदे सरकारकडून 500 कोटींचं गिफ्ट, पण मंत्रिपदाचं काय?

नाराज बच्चू कडू यांना शिंदे सरकारकडून 500 कोटींचं गिफ्ट, पण मंत्रिपदाचं काय?

 मंत्रिमंडळात समावेश न झाल्यामुळे बच्चू कडू कमालीचे नाराज आहेत. अलीकडेच आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामध्ये वाद पेटला

मंत्रिमंडळात समावेश न झाल्यामुळे बच्चू कडू कमालीचे नाराज आहेत. अलीकडेच आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामध्ये वाद पेटला

मंत्रिमंडळात समावेश न झाल्यामुळे बच्चू कडू कमालीचे नाराज आहेत. अलीकडेच आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामध्ये वाद पेटला

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 02 नोव्हेंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडामध्ये सहभागी झाले पण मंत्रिपद न मिळाल्यामुळे प्रहार संघटनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू नाराज आहे. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आता शिंदे सरकारने खास भेट दिली आहे. बच्चु कडू यांच्या अचलपूर मतदार संघातील सपन प्रकल्पाला 500 कोटींचा निधी दिला जाणार आहे. मंत्रिमंडळात समावेश न झाल्यामुळे बच्चू कडू कमालीचे नाराज आहेत. अलीकडेच आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामध्ये वाद पेटला व त्यावर पडदाही पडला. पण अजूनही बच्चू कडू नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नाराज असलेल्या आमदार बच्चू कडू यांना खुश करण्याचा शिंदे सरकारने प्रयत्न केला आहे. बच्चू कडू यांच्या अचलपूर मतदारसंघातील सपन प्रकल्पाला 500 कोटींचा निधी देणार आहे. (..हा म्हणजे आंधळी कोशिंबीरीचा खेळ, कडू-राणा वादात अंधारेंचा फडणवीसांवर प्रहार) सपन मध्यम प्रकल्पाला 500 कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीच्या समोर आली आहे. कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात महत्वाची भूमिका घेतली होती. मात्र मंत्रिपदापासून डावलल्याने बच्चू कडू नाराज आहेत. (राणानं दिलगिरी व्यक्त केली त्याचा आनंद, नाहीतर…; वादानंतर बच्चू कडूंचं अमरावतीमध्ये शक्तीप्रदर्शन) त्याचसोबत रवी राणा यांच्या वादासंदर्भात स्वत: मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली होती. त्यानंतर त्यांच्या मतदारसंघात ५०० कोटी रुपयांचा निधी देऊन बच्चू कडू यांना खुश करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा रंगली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात