मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Bigg Boss 16: 'बिग बॉस 16' ची ट्रॉफी जिंकणारा होईल मालामाल; बक्षिसाची रक्कम वाचून व्हाल चकित

Bigg Boss 16: 'बिग बॉस 16' ची ट्रॉफी जिंकणारा होईल मालामाल; बक्षिसाची रक्कम वाचून व्हाल चकित

बिग बॉस 16

बिग बॉस 16

फिनालेमध्ये गेलेल्या टॉप ५ स्पर्धकांची नावे समोर आली आहेत. आता या पाच जणांमधून विजेतेपद कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पण त्याआधी विजेत्याला किती रक्कम मिळणार जाणून घ्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 07 फेब्रुवारी : 'बिग बॉस 16' चा फिनाले वीक 6 फेब्रुवारीपासून सुरू झाला असून या सीझनचा ग्रँड फिनाले येत्या 12 फेब्रुवारीला होणार आहे. 12 तारखेला 'बिग बॉस 16'ची ट्रॉफी आणि बक्षिसाची रक्कम कोण जिंकणार हे कळेल. 'बिग बॉस 16' च्या ट्रॉफीसाठी टॉप-5 स्पर्धकांमध्ये चुरशीची स्पर्धा आहे. आता फायनल मध्ये गेलेले टॉप ५ स्पर्धकांची नावे देखील समोर आली आहेत. काल घरातून मिड वीक एव्हिक्शन झालं असून निम्रत कौर बाहेर पडली. आता फिनालेमध्ये गेलेल्या टॉप ५ स्पर्धकांची नावे सामोरं आली असून यामध्ये शिव ठाकरे, अर्चना गौतम, स्टॅन, शालीन आणि प्रियांका चौधरीचा समावेश आहे. आता या पाच जणांमधून विजेतेपद कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

'बिग बॉस 16' च्या ट्रॉफीची पहिली झलक दाखवण्यात आली आहे. 'बिग बॉस 16' च्या प्रोमोमध्ये 'बिग बॉस 16' ची ट्रॉफी दिसली. यंदाची ट्रॉफी आत्तापर्यंतच्या असलेल्या ट्रॉफींपेक्षा  पूर्णपणे वेगळी आणि खास आहे. यावेळी 'बिग बॉस 16' च्या ट्रॉफीमध्ये एक युनिकॉर्न बनवण्यात आला आहे, जो चांदी आणि सोनेरी रंगाचा आहे.

हेही वाचा - Rakhi Sawant: राखीच्या सवतीचा फोटो आला समोर; आता अदिलसोबतचा संसार कायमचा मोडणार?

'बिग बॉस 16'साठी 50 लाख रुपयांची बक्षीस रक्कम ठेवण्यात आली होती. परंतु घरातील सदस्यांनी टास्कमध्ये अर्धी रक्कम गमावली. यानंतर बक्षिसाची रक्कम 21 लाख 80 हजार रुपये झाली. बिग बॉसने घरातील सदस्यांना गमावलेली बक्षीस रक्कम परत मिळवण्याची अनेक वेळा संधी दिली आहे, परंतु सर्व अपयशी ठरले आहेत. त्यानुसार सध्या 'बिग बॉस 16' ची बक्षीस रक्कम 21 लाख 80 हजार रुपये आहे. फिनालेमध्ये मनी बॅग टास्क असेल. सूटकेसमध्ये 10 किंवा 20 लाख रुपयांची रक्कम असेल. त्या सुटकेससह अंतिम फेरीच्या शर्यतीतून कोण बाहेर पडणार हे पाहणे बाकी आहे.

'बिग बॉस 16' शी संबंधित प्रत्येक अपडेट देणाऱ्या 'बिग बॉस तक'ने दावा केला आहे की बिग बॉसच्या घरात लाईव्ह मतदानासाठी आलेले सर्व लोक हे महाराष्ट्रातील होते आणि ते 'बिग बॉस मराठी'चे चाहते होते. बिग बॉसच्या घरात गेल्यावर सर्वांनी शिव ठाकरे यांना पाठिंबा दिला आणि त्यांच्या बाजूने मतदान केले.

'बिग बॉस तक'च्या रँकिंगनुसार शिव ठाकरे पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर एमसी स्टॅन, तिसऱ्या क्रमांकावर प्रियांका चहर चौधरी, चौथ्या क्रमांकावर शालीन भानोत आणि पाचव्या क्रमांकावर अर्चना गौतम. म्हणजेच, यानुसार शिव आणि प्रियांकाची नावे टॉप-2 स्पर्धकांमध्ये असतील. म्हणजेच शिव ठाकरे 'बिग बॉस 16' चा विजेता होण्याची दाट शक्यता आहे.

First published:

Tags: Bigg boss, Entertainment