मुंबई, 07 फेब्रुवारी : राखी सावंतचं नाव सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. एवढे दिवस तिने लग्न केल्याची चर्चा रंगली होती. पण आता लग्न मोडल्याची चर्चा आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच राखीने लग्नाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत खळबळ उडवून दिली होती. तिने सांगितले होते कि तिने 8 महिन्यांपूर्वी आदिलशी लग्न केले होते. पण अदिलने दोघांचं लग्न सगळ्यांपासून लपवण्यास भाग पाडले. त्यानंतर राखीनं आपलं नाव देखील बदललं होतं. सगळं सुखात सुरु असताना आईचं निधन झाल्यावर राखीने वेगळाच खुलासा केला तिने असा दावा केला आहे की आदिलचे तीन मुलींसोबत प्रेमसंबंध आहेत. याची चर्चा सुरु असताना आता अदिलच्या गर्लफ्रेंडचा फोटो समोर आला आहे.
राखी सावंतने मीडियाशी बोलताना दावा केला होता की ती मराठी बिग बॉसमध्ये असल्यापासून त्या मुलीचे आदिल खान दुर्रानीसोबत अफेअर होते. इतकेच नाही तर रात्री आदिलने तिला मुलीचे नाव किंवा फोटो मीडियाला दिल्यास तो तिला सोडून जाईल असे सांगितले असल्याचेही राखीने सांगितले होते. या सर्व आरोपांनंतर आदिलने मौन सोडत मीडियामध्ये न येता त्याने इन्स्टाग्रामवर राखीला सडेतोड उत्तर दिले होते. आता अदिलचा गर्लफ्रेंड सोबत फोटो व्हायरल झाला आहे.
हेही वाचा - वैदेही परशुरामी 'रसोडे में कोन था' फेम यशराज मुखाटेला करतेय डेट? अखेर दोघांच्या नात्याविषयी झाला खुलासा
राखी सावंतने आदिल खान दुर्रानीच्या गर्लफ्रेंडचे नाव तनु असल्याचे सांगितले आहे. ती मराठी बिग बॉसमध्ये असताना आदिलचे अफेअर सुरू झाल्याचे बोलले जाते. पाच आठवड्यांनंतर बाहेर आल्यावर तिला हा प्रकार कळला. तनु चंदेल आणि आदिलचे सर्व फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. राखीच्या म्हणण्यानुसार, तनु ही इंदूरची आहे. तिथे एक फ्लॅटही आहे. तिच्याकडे स्वतःची बीएमडब्ल्यू कार आहे.
View this post on Instagram
राखीच्या म्हणण्यानुसार, तनु आयआयटीमधून पास आऊट आहे. आणि आता एक बिझनेसवुमन आहे. राखीचे म्हणणे आहे की, तनु गेल्या 8 वर्षांपासून बॉलीवूडमध्ये काम करण्यासाठी संघर्ष करत आहे तसेच तीने आतापर्यंत छोटामोठ्या भूमिका देखील साकारल्या आहेत. तिचे वय 37 वर्षे आहे.
तनूचे पूर्ण नाव काय आहे, याचा खुलासा करण्यात आलेला नाही, मात्र जे फोटो समोर आले आहेत, त्यात तनूचे पूर्ण नाव तनू चंदेल असल्याचे सांगण्यात येत आहे. ती एक टिकटोकर आहे. तिचे खरे नाव निवेदिता चंदेल आहे. तिला आदिल खान दुर्रानी देखील इन्स्टाग्रामवर फॉलो करतो. तसेच 604k फॉलोअर्स आहेत. राखी ज्या मुलीबद्दल बोलत आहे तीच ती मुलगी आहे हे अद्याप निश्चित झाले नसले तरी आदिलला फॉलो केल्यामुळे 99% ती त्याची गर्लफ्रेंड आहे अशी चर्चा रंगली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Rakhi sawant