जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Bigg boss 16: बिग बॉसच्या घरात पाहायला मिळणार करण जोहरचा दबंग अवतार; 'या' स्पर्धकाची घेणार शाळा

Bigg boss 16: बिग बॉसच्या घरात पाहायला मिळणार करण जोहरचा दबंग अवतार; 'या' स्पर्धकाची घेणार शाळा

बिग बॉस 16

बिग बॉस 16

बिग बॉस ओटीटी होस्ट केलेला करण जोहर पहिल्यांदाच बिग बॉस होस्ट करणार आहे आणि तोही पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने. बिग बॉस OTT मधील स्पर्धकांसोबत नेहमी सौम्यपणे वागणारा करण यावेळी ‘दबंग’ अवतारात दिसणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 22 ऑक्टोबर : ‘बिग बॉस’च्या सोळाव्या सीजनची धमाकेदार सुरुवात झाली आहे. शोच्या पहिल्याच तीन आठवड्यात घरामध्ये वादविवाद, प्रेम, मैत्री, राडे पाहायला मिळत आहेत. बिग बॉस 16 चा या आठवड्याचा ‘वीकेंड का वार’ काहीसा वेगळा असणार आहे. कारण या आठवड्यात शोमध्ये सलमान खान नाही तर करण जोहर कुटुंबातील सदस्यांचा क्लास घेण्यासाठी येणार आहे. बिग बॉस ओटीटी होस्ट केलेला करण जोहर पहिल्यांदाच बिग बॉस होस्ट करणार आहे आणि तोही पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने. बिग बॉस OTT मधील स्पर्धकांसोबत नेहमी सौम्यपणे वागणारा करण यावेळी ‘दबंग’ अवतारात दिसणार आहे, ज्याची एक झलक नुकतीच शेअर केली गेली आहे. या वीकेंड का वारमध्ये करण जोहर स्पर्धकांचा जोरदार क्लास घेताना दिसणार आहे. करण जोहरने यावेळी कुटुंबातील सदस्यांना योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. निर्मात्यांनी नुकत्याच रिलीज केलेल्या प्रोमोमध्ये, करण हरियाणाची शकीरा म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोरी नागोरीच्या कृत्यांवर रागावताना दिसत आहे.  ज्यामध्ये तो तिला विचारतो की ‘तुला घरात राहायचंय कि बाहेर जायचंय?’ म्हणजे, ज्या स्पर्धकांना अनेकदा सलमान खानची भीती वाटते त्यांना यावेळी करण जोहरच्या रागाला  सामोरे जावे लागणार आहे. हेही वाचा - Salman Khan: ‘या’ आजाराने त्रासलाय सलमान खान, वाचा बिग बॉसमधील एक्झिटचं कारण शेअर केलेल्या प्रोमोची सुरुवात गोरी नागोरीने घराची सध्याची कॅप्टन अर्चना गौतमला त्रास दिल्याने होते. ती अर्चनाला खूप चिडवण्याचा प्रयत्न करते. गोरी म्हणते- ‘कॅप्टन हे तुमच्या खेळीचे फळ आहे. बिग बॉस मी डोके फोडीन. बिग बॉस, मला उत्तर हवे आहे, नाहीतर आज इथे कोणाचे हात पाय मोडू शकतात.’

जाहिरात

गोरीच्या कृत्यांवर प्रतिक्रिया देताना करण जोहर म्हणतो- ‘गोरीने जी चिथावणी दिली, त्यामध्ये कुणाला इजा करण्याचा प्रयत्न होता की नाही? बिग बॉसलाही धमकी दिली. गोरी, तुला घरात राहायचं की बाहेर जायचं? कारण, यावेळी करण जोहर त्यांना धडा शिकवण्याच्या पूर्ण मूडमध्ये दिसत आहे. सलमान खान या आठवड्यात वीकेंड का वार होस्ट करणार नाही, कारण त्याला डेंग्यू झाल्याच्या बातम्या येत आहेत. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, सलमान खानला डेंग्यू झाल्याचे निदान झाले आहे, त्यामुळे तो ‘बिग बॉस 16’ चे पुढील काही भाग होस्ट करणार नाही. अशा परिस्थितीत निर्मात्यांनी शो होस्ट करण्यासाठी करण जोहरशी संपर्क साधला.

News18लोकमत
News18लोकमत

करण जोहरबाबत सांगायचं तर करणने बिग बॉस ओटीटी हा शो होस्ट केला आहे. गेल्या वर्षी टेलिव्हिजनवर बिग बॉसचा 15वा सीजन सुरु होण्यापूर्वी डिजिटल प्लॅटफॉर्मवर ‘बिग बॉस ओटीटी’ प्रसारित करण्यात आला होता. या शोलासुद्धा प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. हा शो करण जोहरने होस्ट केला होता. यामध्ये करणने प्रत्येक आठवड्याच्या शेवटी स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात