मुंबई, 22 ऑक्टोबर : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. येत्या काही एपिसोडमध्ये सलमान खान सूत्रसंचालन करणार नसून तो बिग बॉसमध्ये दिसणार नाहीये. सलमान खानच्या जागी निर्माता-दिग्दर्शक करण जोहर बिग बॉसच्या घराची सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळणार आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून सलमानची प्रकृती ठीक नाहीये. सलमानची प्रकृती ठीक नसल्यानं हा निर्णय घेतला असल्याचं समोर आलं आहे. प्रकृती ठीक नसल्यामुळे सलमानचे सगळे शूटिंगही थांबवण्यात आले आहे. त्यामुळे सलमानचे चाहते चिंतेत आहेत. सलमान खानच्या प्रकृतीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. सलमान खानला डेंग्यू झाला आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून सलमान खानची तब्येत बिघडत चालली असल्याचं समोर येत आहे. शोच्या येत्या काही आठवड्यांत सलमान खान दिसणार नाही. ‘बॉलिवूड हंगामा’ नुसार, सलमान खानला डेंग्यू झाल्याचे निदान झाले असून डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. तो त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाचे शूटिंगही करत होता. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो सध्या शूटिंगही करणार नाहीये.
करणने याआधी ‘बिग बॉस ओटीटी’ होस्ट केला आहे. यामुळेच सलमानने स्वतः करणला फोन करून शो होस्ट करण्यास सांगितले. करणही त्यांना नकार देऊ शकला नाही. करण खरं तर सलमानचा खूप आदर करतो. त्याच्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातील साईड रोलसाठी अनेक कलाकारांनी काम करण्यास नकार दिला तेव्हा सलमाननेच ती भूमिका स्वीकारली.
दरम्यान, टीव्हीचा सर्वात मोठा रिअॅलिटी शो बिग बॉससाठी सलमान खानची खास ओळख आहे. जर सलमान खान त्याचा होस्ट नसेल, तर क्वचितच कोणाला शो एवढ्या उत्साहाने पाहायला आवडेल. पण आगामी वीकेंडचा युद्ध तुम्हाला सलमान खानशिवाय पार करावा लागणार आहे. कारण सलमान खानला डेंग्यू झाला आहे. त्यामुळेच करण जोहर ‘वीकेंड का वार’ होस्ट करणार आहे. शोचा प्रोमो देखील आला आहे ज्यामध्ये करण जोहर स्पर्धकांचा क्लास घेताना दिसत आहे.