मुंबई, 19 मार्च : बिग बॉसचा 16 वा सिझन चांगलाच हिट ठरला. यात मराठमोळ्या शिव ठाकरे ने सगळ्यांचंच लक्ष वेधलं. शिवने शेवट्पर्यंत मजल मारत फर्स्ट रनर अप ठरला. त्याने विजेतेपद जिंकलं नसलं तरी प्रेक्षकांचं मन नक्कीच जिंकलं. बिग बॉस 16 नंतर शिव ठाकरेचा चाहतावर्ग प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्याला आता नवीन शो मध्ये पडद्यावर पुन्हा पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. नुकतीच शिवने त्याची पहिली गाडी देखील खरेदी केली. त्यामुळे त्याचे चाहते सध्या प्रचंड खुश आहेत. आता त्यानंतर शिवच्या चाहत्यांसाठी अजून एक आनंदाची बातमी आहे. शिव ठाकरेला एका खास पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. शनिवारी मनोरंजन सृष्टीतील महत्वाचा आयकॉनिक गोल्ड अवॉर्ड्स 2023 हा पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये छोट्या पडद्यावरील अनेक सेलिब्रिटीज सहभागी झाले होते. यामध्ये कपिल शर्मा, दिया मिर्झा, करण कुंद्रा तसेच अंकिता लोखंडे या कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती. तर बिग बॉसचे स्पर्धक शिव ठाकरे, अब्दू रोजीक आणि प्रियांका चौधरी हे देखील सहभागी झाले होते. या सोहळ्यात चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या यादीत शिव ठाकरेचे नाव अग्रणी आहे. Bigg Boss 16 चा विजेता एमसी स्टॅनच्या कॉन्सर्टमध्ये करणी सेनेचा तुफान राडा; चाहत्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज गोल्ड अवॉर्ड्स 2023 मध्ये शिव ठाकरेला बिग बॉसचा सर्वात लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून पुरस्कार देत गौरवण्यात आलं आहे. शिव ठाकरेला हा पुरस्कार मिळताच त्याच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट झाला. हा पुरस्कार स्वीकारताना शिव ठाकरे खूपच आनंदी दिसत होता. शिव ठाकरेला हा पुरस्कार मिळताच चाहते देखील खूपच खुश झाले आहेत. शीवच्या उपस्थितीने पुरस्कार सोहळ्यात सगळ्यांचंच लक्ष वेधलं.
शिव ठाकरेने यंदाच्या सीझनची ट्रॉफी जरी जिंकली नसली तरी प्रेक्षकांच्या मनात त्याच्याबद्दल एक वेगळं स्थान आहे हे लक्षात येतं. आपल्या नम्रपणाने आणि खेळाडू वृत्तीने शिवने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता या क्षेत्रात त्याची अशीच प्रगती होत जावो अशी इच्छा चाहते व्यक्त करत आहेत.
दरम्यान शिवने नुकतंच त्याच एक स्वप्न पूर्ण केलं आहे. ते म्हणजे शिवने नवीन गाडी खरेदी केली आहे. आतापर्यंत दोन सेकंड हँड गाड्या वापरणाऱ्या शिवने स्वतःसाठी पहिल्यांदाच नवी गाडी खरेदी केली आहे. त्यामुळे बिग बॉस शिवसाठी खूपच लकी ठरलं असं म्हणणं वावगं ठरणार नाही. बिग बॉस नंतर शिव त्याच्या आगामी प्रोजेक्टवर काम करतोय. तो लवकरच ‘खतरो के खिलाडी’मध्ये दिसणार आहे. त्याला पुन्हा टेलिव्हिजनवर पाहण्यासाठी त्याचे सगळे फॅन्स प्रचंड उत्सुक आहेत.