मुंबई, 16 मार्च : बिग बॉसचा 16 वा सिझन चांगलाच हिट ठरला. यात शिव ठाकरे ने सगळ्यांचंच लक्ष वेधलं. शिवने शेवट्पर्यंत मजल मारत फर्स्ट रनर अप ठरला. त्याने विजेतेपद जिंकलं नसलं तरी प्रेक्षकांचं मन नक्कीच जिंकलं. बिग बॉस 16 नंतर शिव ठाकरेचा चाहतावर्ग प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्याला आता नवीन शो मध्ये पडद्यावर पुन्हा पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. त्यापूर्वी शिव ठाकरेने त्याचं एक स्वप्न पूर्ण केलं आहे. चाहत्यांना त्याने आनंदाची बातमी दिली आहे. शिव ठाकरेने काही दिवसांपूर्वी तो नवीन गाडी घेणार असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. आता शिव ठाकरेने अखेर स्वत:साठी नवीन कार खरेदी केली आहे. शोरूममधून शिव ठाकरेच्या कारचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून चाहते त्याचं खूप अभिनंदन करत आहेत. यावेळी शिव ठाकरेने पारंपरिक पद्धतीने नारळ फोडून आपल्या गाडीचे स्वागत केले. तसेच त्याने आपल्या टीमसोबत केक देखील कापला. दोन सेकंड हँड कारनंतर शिव ठाकरेची पहिली नवीन कार पाहून त्याचे चाहतेही खूप खूश आहेत. त्याच्यावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. व्हिडिओमध्ये शिव ठाकरे नवीन कार मुळे खूपच आनंदी दिसत आहे. Prajakta Mali: ‘घरातले 2 कोपरे कौतूकानं…’ महत्वाचा सन्मान मिळताच भावुक झाली प्राजक्ता माळी शिव ठाकरेचा हा व्हिडीओ पापाराझी विरल भयानीने शेअर केला आहे. या व्हिडीओखाली कमेंट करत शिवच्या चाहत्यांनी लिहिलंय कि, ‘शिवला त्याच्या कष्टाचं फळ अखेर मिळालं’, तुझी अशीच प्रगती होऊ दे’ असं म्हणत त्यांनी आपल्या लाडक्या शिवला शुभेच्छा दिल्या आहेत.
अलीकडेच एका मुलाखतीत शिवने गाडी घेण्याविषयी खुलासा केला होता. यावेळी बोलताना ती म्हणाला होता कि, ‘बिग बॉसनंतर माझं आयुष्य नक्कीच बदललं आहे. आता मी गाडीही बूक केली आहे. हे सरप्राइज होतं. पहिल्यांदाच मी हे सगळ्यांसमोर सांगत आहे. मी कामासाठी बाहेर पडलो तेव्हा मी माझ्या मित्राला म्हटलं की, तुझं काम आहे तर तू कार घेऊन नको येऊ. मी माझ्या कामासाठी रिक्षाने जातो. कारण मी माझ्या मित्राच्या कारने प्रवास करतो. रिक्षाने जात असताना मला बघून सगळेच जण थांबत होते. ‘बिग बॉस मराठी’नंतरही आयुष्य बदललं. पण आता त्यापेक्षाही अधिक आयुष्य बदललं आहे.’ अश्या भावना त्याने व्यक्त केल्या होत्या.
शिवचं गाडी खरेदी करण्याचं आणखी एक स्वप्न आता पूर्ण झालं आहे. बिग बॉस नंतर शिव त्याच्या आगामी प्रोजेक्टवर काम करतोय. तो लवकरच ‘खतरो के खिलाडी’मध्ये दिसणार आहे. त्याला पुन्हा टेलिव्हिजनवर पाहण्यासाठी त्याचे सगळे फॅन्स प्रचंड उत्सुक आहेत.