• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • सिद्धार्थ शुक्लानं घेतला अर्जुन कपूरशी पंगा, सोशल मीडियावर भांडणाचा VIDEO VIRAL

सिद्धार्थ शुक्लानं घेतला अर्जुन कपूरशी पंगा, सोशल मीडियावर भांडणाचा VIDEO VIRAL

सिद्धार्थ शुक्ला आणि अर्जुन कपूरच्या भांडणाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 • Share this:
  मुंबई, 14 फेब्रुवारी : बिग बॉस 13 च्या स्पर्धकांमध्ये सर्वाधिक चर्चेत कोण राहिलं असेल तर तो म्हणजे सिद्धार्थ शुक्ला. या शोमध्ये सिदार्थ सर्वाधिक चर्चेत राहिला तो त्याच्या वादग्रस्त वर्तणुकीमुळे. बिग बॉसच्या घरात असा एकही सदस्य नाही ज्याच्याशी सिद्धार्थचा वाद किंवा भांडण झालेला नाही. त्यामुळे घरात अँग्री यंग मॅन अशी त्याला ओळख मिळाली. पण अशाप्रकारे नॅशनल टेलिव्हिजनवर वाद घालण्याची सिद्धार्थची ही पहिलीच वेळ नाही. आता बिग बॉस 13चा फायनलिस्ट झालेला सिद्धार्थ याआधी ‘खतरों के खिलाडी 7’चा विजेता आहे आणि यावेळी त्यानं बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरशी पंगा घेतला होता. भांडण, फ्लर्टपासून ते सिडनाझ कनेक्शन पर्यंत सिद्धार्थच्या सर्वंच गोष्टी त्याच्या चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या. 15 फेब्रुवारीला या सीझनच्या विनरची घोषणा होणार आहे. त्याआधी सिद्धार्थ शुक्ला आणि अर्जुन कपूरच्या भांडणाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात हे दोघंही एकमेकांवर ओरडत भांडताना दिसत आहेत. Bigg Boss 13 ची बक्षिसाची रक्कम वाढवली? विजेत्याला मिळणार इतके कोटी
  सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ शुक्लाला अर्जुन कपूर ओरडताना दिसत आहे. कारण रिअलिटी शोमध्ये एकिकडे सर्व स्पर्धक उभे राहिले आहेत तर सिद्धार्थ शुक्ला मात्र खाली बसला आहे. अर्जुन त्याला उठयला सांगतो मात्र त्यावर सिद्धार्थ त्याला पाय दुखत असल्याचं कारण देतो. यावर अर्जुन त्याला सांगतो की हे मी माझ्यासाठी सांगत नाही तर हा शोचा फॉरमॅट आहे. त्यावर सिद्धार्थ त्याला तू ओरडून का बोलत आहेस असं विचारतो आणि यावरुन या दोघांमध्ये जारदार भांडण होतं. VIDEO : कार्तिकसोबत साराला पाहून चाहत्यानं म्हटलं ‘भाभी’, आणि... बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं आहे की, टॉप 6 स्पर्धक फिनालेसाठी पोहोचले आहेत. काल झालेल्या एपिसोडमध्ये माहिरा शर्मा घरातून बाहेर पडली. भूत सिनेमाच्या प्रमोशनसाठी आलेला विकी कौशल घरातून जाताना माहिराला घेऊन गेला. जाते वेळी माहिराला अश्रू अनावर झाले होते. माहिराचं स्वप्न तुटलं आहे. तिला शोची विनर व्हायचं नव्हतं. तर या शोमधील स्वतःचा प्रवास पाहण्याचं तिचं स्वप्न होतं. त्यामुळे आता घरात 6 सदस्य उरले आहेत. यापैकी कोणी एकच या सीझनचा विजेता होणार आहे. व्हॅलेंटाइन डेला जन्मलेली अभिनेत्री आणि गुलाब-चिठ्ठीची अधूरी कहाणी
  Published by:Megha Jethe
  First published: