मुंबई, 14 फेब्रुवारी : बिग बॉस 13 च्या फिनालेला आता अवघा एक दिवस उरला आहे. 15 फेब्रुवारीला देशाला सर्वात मोठ्या रिअलिटी शोचा विनर मिळाणार आहे. या शोमधून माहिरा शर्मा बाहेर पडल्यानंतर आता घरात फक्त शहनाझ गिल, सिद्धार्थ शुक्ला, पारस छाब्रा असिम रियाज, रश्मी देसाई आणि आरती सिंह एवढेच सदस्य उरले आहेत. त्यामुळे या सर्वांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. पण या सीझनच्या विनरला प्राइझ मनी किती मिळणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता कायम आहे.
कलर्स टीव्हीवर सुरू असलेल्या बिग बॉसच्या 13 सीझन सर्वाधिक लोकप्रिय ठरला. मात्र अद्याप शोच्या मेकर्सनी या सीझनच्या प्राइज मनी बद्दल कोणताही खुलासा केलेला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार यंदाच्या सीझनमध्ये विजेत्याला मिळाणाऱ्या रक्कमेत वाढ झाली आहे. आतापर्यंतच्या सीझनमध्ये ही रक्कम 50 लाख एवढी होती मात्र यंदाच्या सीझनसाठी ही रक्कम दुप्पट वाढवल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे बिग बॉस 13 च्या विजेत्याला 1 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळल्यास नवल नाही.
व्हॅलेंटाइन डेला जन्मलेली अभिनेत्री आणि गुलाब-चिठ्ठीची अधूरी कहाणी
It’s time you show us how much you support your favorite contestant, share all fan-art pieces made by you, use #BB13FanArt, and the best ones get featured on our page 😍
Watch #BiggBoss13, tonight at 10.30 PM!
Anytime on @justvoot@vivo_india @BeingSalmanKhan #BiggBoss #BB13 pic.twitter.com/auZQgPNDYy
— Bigg Boss (@BiggBoss) February 12, 2020
बिग बॉस 13 च्या प्राइझ मनी बद्दल कोणत्याही प्रकारचे ऑफिशिअल डिटेल्स अद्याप मिळालेले नाहीत. दरम्यान यंदाच्या सीझनला बाकीच्या सीझनच्या तुलनेत चांगला टीआरपी मिळाला. त्यामुळे बिग बॉसच्या इतिहासात हा सीझन सर्वात यशस्वी सीझन ठरला. या सीझनमधील सर्वच सदस्यांनी प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं. त्यामुळे त्यांचा तगडा फॅनफॉलोविंग सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
कल्कीने असा दिला Sappho ला जन्म, पहिल्यांदाच समोर आला वॉटर बर्थचा फोटो
रातोरात घरातून बाहेर पडली माहिरा शर्मा
शोच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं आहे की, टॉप 6 स्पर्धक फिनालेसाठी पोहोचले आहेत. काल झालेल्या एपिसोडमध्ये माहिरा शर्मा घरातून बाहेर पडली. भूत सिनेमाच्या प्रमोशनसाठी आलेला विकी कौशल घरातून जाताना माहिराला घेऊन गेला. जाते वेळी माहिराला अश्रू अनावर झाले होते. माहिराचं स्वप्न तुटलं आहे. तिला शोची विनर व्हायचं नव्हतं तर या शोमधील स्वतःचा प्रवास पाहण्याचं तिचं स्वप्न होतं. त्यामुळे आता घरात 6 सदस्य उरले आहेत. यापैकी कोणी एकच या सीझनचा विजेता होणार आहे.
वॅलेंटाईन डे स्पेशल - राजकुमार रावचं गर्लफ्रेंडला लव्हलेटर