VIDEO : कार्तिकसोबत साराला पाहून चाहत्यानं म्हटलं ‘भाभी’, आणि...

VIDEO : कार्तिकसोबत साराला पाहून चाहत्यानं म्हटलं ‘भाभी’, आणि...

कार्तिक साराच्या ऑफस्क्रिन केमिस्ट्रीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 14 फेब्रुवारी : अभिनेता कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांची प्रमुख भूमिका असलेला सिनेमा ‘लव्ह आज कल’ आज रिलीज होत आहे. मागच्या काही काळापासून या सिनेमासोबतच सारा-कार्तिकच्या पर्सनल लाइफची देखील बरीच चर्चा झाली. हे दोघं डेट करत असल्याचं अनेकदा चर्चा झाल्या मात्र काही दिवसांपूर्वी एक मुलाखतीत कार्तिक आणि सारानं एकमेकांना डेट करत नसल्याचं म्हटलं असलं तरीही सध्या त्यांचा ऑफस्क्रिन केमिस्ट्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एक मुलगा साराला भाभी म्हणताना दिसत आहे.

सिनेमाच्या रिलीज अगोदर कार्तिक आर्यनने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. ज्यात सुरुवातीला कार्तिक आर्यन दोन मुलांसोबत फुटबॉल खेळताना दिसत आहे. पण जेव्हा तिथे सारा येते तेव्हा तिला पाहून त्यातील एक मुलगा म्हणतो, कार्तिक भैय्या भाभी आ गयी. त्या मुलाचं बोलणं एकून कार्तिक जोरजोरात हसू लागतो. सारा सुद्धा त्याचं बोलणं ऐकून हैराण होते आणि कार्तिकला म्हणते, हे तुच बोलायला लावलं आहेस ना?

कल्कीने असा दिला Sappho ला जन्म, पहिल्यांदाच समोर आला वॉटर बर्थचा फोटो

View this post on Instagram

Bhabhi kisko bola ☺️

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

व्हिडीओत पुढे दिसत, सारा त्या मुलाकडे जाते आणि त्याला विचारते, भाभी कोणाला बोललास तू? त्यानंतर कार्तिकनं बोलवल्यावर सारा हसत हसत परत येते. हा व्हिडीओ शेअर करताना कार्तिकनं लिहिलं, ‘भाभी किसको बोला?’ हा व्हिडीओ लव्ह आज कलच्या शूटिंगच्या वेळचा आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. अनेक चाहते यावर मजेदार प्रतिक्रिया देताना दिसत आहे. अर्थात हा सुद्धा त्याच्या सिनेमाच्या प्रमोशनचा एक भाग आहे.

वॅलेंटाईन डे स्पेशल - राजकुमार रावचं गर्लफ्रेंडला लव्हलेटर

View this post on Instagram

Kaafi dubli ho gayi ho Aao pehle jaisi sehat banayein

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘लव्ह आजकल’ हा सिनेमा आज रिलीज होत आहे. या सिनेमात कार्तिक आणि सारा व्यतिरिक्त रणदीप हुड्डा आणि आरुषी शर्मा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन इम्तियाज अली यांनी केलं असून 2009 मध्ये आलेल्या सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणच्या ‘लव्ह आजकल’चा हा पुढचा भाग आहे. या सिनेमाच्या ट्रेलर आणि गाण्यांनाही चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो याकडे सर्वांचं लक्ष लागत आहे.

‘बाप रे बाप’, अक्षय कुमारचे 3 नवे अवतार

First published: February 14, 2020, 9:18 AM IST

ताज्या बातम्या