'त्याने माझ्या ड्रिंकमध्ये ड्रग्स मिसळले आणि...', अभिनेत्री रश्मी देसाईचा गौप्यस्फोट

'त्याने माझ्या ड्रिंकमध्ये ड्रग्स मिसळले आणि...', अभिनेत्री रश्मी देसाईचा गौप्यस्फोट

कास्टिंग काऊचच्या अनेक घटना बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये घडतात. यातील काही प्रकार समोर येतात तर काही प्रकरणं समोर यायच्या आधीच दाबली जातात. टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईने सुद्धा तिच्यासोबत घडलेला एक प्रसंग शेअर केला आहे.

  • Share this:

नवी दिल्‍ली, 3 मार्च : कास्टिंग काऊचच्या अनेक घटना बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये घडतात. यातील काही प्रकार समोर येतात तर काही प्रकरणं समोर यायच्या आधीच दाबली जातात. अनेक कलाकार त्याचे शिकार झाले आहेत. टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईने सुद्धा तिच्यासोबत घडलेला एक प्रसंग शेअर केला आहे. रश्मी देसाई (Rashami Desai) हा छोट्या पडद्यावरील गाजलेला चेहरा. बिग बॉस 13 मध्येही तिने बरंच नाव कमावलं. पण ‘तपस्या’ ही भूमिका प्रेक्षकांच्या अधिक लक्षात राहिलेली आहे. ही अभिनेत्री देखील कास्टिंग काऊचची शिकार झाली आहे. रश्मीसाठी प्रसिद्धी मिळवणं काही सोपं काम नव्हतं.  Pinkvilla ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने याबाबत खुलासा केला आहे. तिने असं सांगितलं की, ती एका ठिकाणी ऑडिशनला गेली असताना तिच्या ड्रिंकमध्ये ड्रग मिसळण्यात आले होतं.  मात्र तिच्या आईला हा प्रकार समजल्यावर त्या इसमाच्या तिने थोबाडीत लगावली होती.

(हे वाचा-श्वेता तिवारीच्या मुलीचे हॉट फोटो VIRAL, कियारा अडवाणीच्या TOPLESS फोटोला टक्कर)

रश्मी देसाईने (Rashami Desai) या मुलाखतीमध्ये सांगितलं की, ‘जेव्हा 13 वर्षांपूर्वी मी माझं करिअर सुरू केलं त्यावेळी एकतर मी लहान होते आणि त्यात माझी पार्श्वभूमी नॉन फिल्मी होती. मला आठवतंय मला सांगण्यात आलं होतं की, तु कास्टिंग काऊचचा सामना नाही केला तर काम नाही मिळणार. त्याचं नाव सूरज होतं. मला माहित नाही आता तो कुठे आहे. सुरूवातीला त्याने मला स्टॅटिस्टिक्स बद्दल विचारलं. त्याचा अर्थ मला माहित नव्हता. त्याला माहित होतं की मला या गोष्टींची कल्पना नाही आहे.’

(हे वाचा-‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील आलिया-रणबीरचा रोमँटिक सीन लीक, VIDEO झाला व्हायरल)

ती पुढे म्हणाली की, ‘तो पहिला माणूस होता ज्याने माझा फायदा घेण्याचा आणि छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. एके दिवशी त्याने मला ऑडिशनसाठी बोलावलं. मी पोहोचल्यावर मला लक्षात आलं की त्याठिकाणी अजून दुसरं कुणीच नाही आहे. तिथे एक कॅमेरा होता. माझ्या ड्रिंकमध्ये अंमली पदार्थ मिसळून मला बेशुद्ध करण्याचा त्याने पूर्ण प्रयत्न केला. मी त्याला सांगत होते, मला हे काही करायचं नाही आहे. दोन-अडीच तासानंतर मी तिथून बाहेर आले आणि घरी पोहोचल्यावर आईला सर्व सांगितलं. दुसऱ्या दिवशी मी आईसोबत पुन्हा तिथे गेले आणि त्यावेळी आईने त्याला थोबाडीत लगावली होती.’

बॉलिवूड असो किंवा टीव्ही, दोन्हींमध्ये अनेक अभिनेत्रींना अशा घटनांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे अनेक हरहुन्नरी अभिनेत्री जगासमोर आलेल्याच नाही आहेत.

First published: March 3, 2020, 6:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading