Home /News /entertainment /

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील आलिया-रणबीरचा रोमँटिक सीन लीक, VIDEO झाला व्हायरल

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील आलिया-रणबीरचा रोमँटिक सीन लीक, VIDEO झाला व्हायरल

अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt), रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हे सध्याचं बॉलिवूडमधील सर्वांच्या आवडीचं कपल आहे. दोघांचे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात.

  मुंबई, 3 मार्च : अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt), रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हे सध्याचं बॉलिवूडमधील सर्वांच्या आवडीचं कपल आहे. दोघांचे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. अनेक फॅमिली फंक्शनमध्ये सुद्धा दोघे एकत्र दिसतात. दोघांच्या मुख्य भूमिका असणारा ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमा लवकरच प्रदर्शित होणारआ आहे. यामध्ये अमिताभ बच्‍चन (Amitabh Bachchan) यांची सुद्धा मुख्य भूमिका असणार आहे. यावर्षी 4 डिसेंबरला ही फिल्म प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनाच्या तारखेवरून या चित्रपटाबाबत वादंग निर्माण झाला होता. सध्या या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. यादरम्यान या सिनेमातील चित्रकरणादरम्यानचे काही व्हिडीओ लीक झाले आहेत. ज्यामध्ये आलिया आणि रणबीर कपूरचे ठुमके पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. (हे वाचा- अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या शिव्या बागी-3 साठी पडल्या महागात) इंस्‍टाग्रामवर 'इंडिया फोरम्स बॉलिवूड' नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर आणि आलिया दोघेजणं ब्रह्मास्त्रमधील एका गाण्याची शूटिंग करताना दिसत आहेत.
  या व्हिडीओमधून दोघांची केमिस्ट्री स्पष्ट दिसून येत आहे. समुद्राच्या ठिकाणी या दृश्याचं चित्रीकरण सुरू आहे. रणबीर आणि आलियाची हा पहिला चित्रपट असला तरी दोघांमधील ऑफस्क्रीन केमिस्ट्री चित्रपटातील रोमान्ससाठी फायद्याची ठरत आहे. या चित्रपटासाठी आलिया-रणबीरचे फॅन्स खूप उत्सुक आहेत.
  अयान मुखर्जी दिग्दर्शित फिल्म 'ब्रह्मास्त्र'मध्ये रणबीर कपूर-आलिया भट्टबरोबरच अमिताभ बच्चन सुद्धा असणार आहेत. त्याचप्रमाणे चित्रपटामध्ये मौनी रॉय, नागार्जून, डिंपल कपाडिया, प्रतीक बब्बर सुद्धा महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत. अभिनेत्री मौनी रॉय 'ब्रह्मास्त्र'मध्ये खलनायिकेची भूमिका साकारणार आहे. तीन भागांमध्ये बनणाऱ्या चित्रपटाचा निर्माता करण जोहर असणार आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Ranbir kapoor

  पुढील बातम्या