मुंबई,21 डिसेंबर- बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणवीर सिंहचा (Ranveer Singh) बहुप्रतीक्षित चित्रपट '83' 24 डिसेंबरला चित्रपटगृहामध्ये रिलीज होणार आहे. कबीर खान दिग्दर्शित स्पोर्ट्स ड्रामावर आधारित या चित्रपटात बॉलिवूडचा नायक रणवीर भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटर कपिल देव (Kapil Dev Role) यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. कपिल देवच्या भूमिकेत येण्यासाठी रणवीरनं खूप मेहनत घेतली आहे. रणवीर चित्रपटाच्या पोस्टर आणि टीझरमध्ये कपिल देवची अचूक प्रतिकृती दिसत आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोण कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.
रणवीर सिंहने कपिल देव यांच्याप्रमाणे बॉलिंग आणि बॅटिंग करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. कपिल देव यांच्या प्रसिद्ध नटराज पोझमधील रणवीरला बॉलिंग अॅक्शनमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. रणवीरच्या या अॅक्शनचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 1983 मध्ये भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्याची कथा कबीर खान यांनी मोठ्या पडद्यावर मांडली आहे.
View this post on Instagram
'83'मध्ये रणवीर सिंहने कपिल देवची हुबेहूब कॉपी करण्यासाठी मेहनत घेतली आहे. केवळ खेळण्याची ऍक्शनच नाही तर चालण्याची पद्धत आणि ग्रेडियंट देखील कॉपी केलं आहे. रणवीर सिंहने मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, 'कपिल देवची बॉलिंग अॅक्शन कॉपी करणं सर्वात कठीण होतं. त्यांची बॉलिंग अॅक्शन आणि बायोमेकॅनिकही अद्वितीय आहे. माझं शरीर त्यांच्यापेक्षा खूप वेगळं आहे. त्यामुळे मला शारीरिक परिवर्तन करावं लागलं. सुरुवातीला माझं शरीर खूप जड होतं, कारण मी 'सिम्बा'च्या शूटमधून आलो होतो.
(हे वाचा:शाहिद कपूरनं 'Jersey' च्या प्रमोशनमध्ये घातला इतका महागडा जॅकेट)
रणवीर सिंह पुढं सांगतो की, '83 वर्ल्ड कपचा महान खेळाडू बलविंदर सिंह संधू जे आमचे कोच देखील होते. त्यांनी पाहिलं की माझं शरीर खूप जड आहे. आणि मग ते म्हणाले, की जेव्हा तुम्ही रनअपमध्ये आलात तेव्हा तुम्हाला कुस्तीपटूसारखे वाटते. बॉलिंग करायला येत आहे. आणि त्यांनी मला जवळपास एक महिन्यासाठी परत पाठवले जेणेकरून मी कपिल देवच्या पात्रात येण्यासाठी आवश्यक असलेले शारीरिक बदल करू शकेन.यासाठी मी 6 महिने रोज 4 तास क्रिकेट खेळायचो आणि 6 महिने 2 तास माझी फिजिकल कंडिशनिंग करायचो. परिपूर्णता आणण्यासाठी मी तासनतास मेहनत केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Ranveer sigh