बॉलिवूड अभिनेता गोविंदा हा एक अतिशय लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचा चाहतावर्ग फार मोठा आहे. गोविंदाने आपला डान्स आणि विनोदाच्या माध्यमातून चाहत्यांचं मन जिंकलं आहे. मात्र या अभिनेत्याचं बॉलिवूडच्या या मोठ्या कलाकारांशी वाकडं आहे. पाहूया कोण आहेत हे कलाकार
गोविंदा नेहमीच आपल्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखला जातो. मात्र बॉलिवूड मध्ये असे काही लोक आहेत ज्यांच्याशी गोविंदाच अजिबात जमत नाही.
बॉलिवूडचा दबंग अर्थातच सलमान खान आणि गोविंदा फारच चांगले मित्र होते. त्यांनी पार्टनर चित्रपटातून लोकांच मनोरंजन केलं होतं. मात्र एकवेळ अशी आली कि या दोघांची मैत्री संपली आणि हे दोघेही एकमेकांचे कट्टर विरोधक बनले.
शाहरुख खान आणि गोविंदा यांच्यामध्येसुद्धा वाद निर्माण झाला होता. शाहरुखने एका मुलाखतीत म्हटलं होतं, कि आपल्या सारखा अभिनय गोविंदालासुद्धा जमत नाही'. शाहरुखने ही गोष्ट गोविंदाला दुखावण्यासाठी म्हटली नसली तरी यानंतर त्यांच्यातलं नातं कायमचं घडलं होत. शाहरुखने त्याची माफीही मागितली होती.
अभिनेता संजय दत्त आणि अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकील यांचा एक ऑडिओ टेप लीक झाला होता. त्यामध्ये संजयने गोविंदासाठी अपशब्द वापरले होते. त्यामुळे त्यांच्या मैत्रीत फूट पडली होती.
मामा-भाचा असणारे गोविंदा आणि कृष्णासुद्धा एकमेकांनाच्या विरुद्ध आहेत. या दोघचं भांडण आता सर्वांनाच माहिती झालं आहे.
गोविंदा नई दिवंगत ज्येष्ठ अभिनेते अमरीश पुरी यांच्यामध्येसुद्धा टोकाचा वाद झाला होता. इतकंच नव्हे तर अमरीश यांनी गोविंदाच्या कानाखाली दिली होती. अमरीश आणि गोविंदा एका चित्रपटात एकत्र काम करत होते. गोविंदाच्या सेटवर उशिरा येण्याने त्यांच्यात हा वाद झाला होता.
दिग्दर्शक डेव्हिड धवन आणि गोविंदा यांची जोडी फारच लोकप्रिय होती. मात्र या जोडीमध्ये मोठा वाद झाला होता. डेव्हिड यांनी आपल्या चश्मे बहाद्दूर चित्रपटाच्या रिमेकची कल्पना चोरल्याचा आरोप गोविंदाने केला होता. यामध्ये त्यांनी ऋषी कपूरला साइन केलं होतं.
गोविंदा आणि करण जोहर यांच्यामध्येसुद्धा एक प्रकारचा वाद आहे,गोविंदाने करणला डेव्हिड धवनपेक्षा जास्त डेंजरस असल्याचं म्हटलं होतं.