मुंबई, 5 डिसेंबर- बॉलिवूडचे लोकप्रिय आणि सर्वात चर्चित जोडपे अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे सध्या मालदीवमध्ये एकत्र व्हेकेशन एन्जॉय करत आहेत. मलायका-अर्जुन, दोघेही मालदीवमधील त्यांचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ (शेयर (Arjun Kapoor-Malaika Arora Photos & Videos) आपापल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करत आहेत. अशाच एका व्हिडिओमध्ये मलायका सायकल चालवताना दिसली. अर्जुनने त्याचा व्हिडिओ त्याच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे अर्जुन कपूर जेव्हा त्याचा व्हिडीओ बनवत होता तेव्हा मलायकाला याची माहिती नव्हती. तसे, मलायकाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर सायकल चालवतानाचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओवर चाहते कमेंटचा वर्षाव करत आहेत. व्हिडिओ पाहता, मलायका अरोरा- अर्जुन कपूर हे व्हेकेशन खूप एन्जॉय करत असल्याचे दिसते. यापूर्वी मलायकाने तिचे सोलो फोटो शेअर केले होते. पण अर्जुन कपूरही तिच्यासोबत आहे हे देखील लोकांना लगेच समजले. त्या फोटोंमध्ये मलायका समुद्राजवळ बिकिनीमध्ये सेल्फी घेताना दिसली होती. तिचे ग्लॅमरस फोटो पाहून चाहते थक्क झाले होते. मध्ये काही बातम्या आल्या होत्या की, या दोघांच्यात काही ठीक नाही. पण अर्जुन-मलायकाच्या फोटो आणि व्हिडिओवरून हे स्पष्ट झाले आहे की दोघेही त्यांच्या नात्यात खूप खूश आहेत.
वाचा : बबली गर्ल प्रिया बापटच्या स्माईलवर चाहते फिदा , ग्लॅमरस फोटोंवर खिळल्या नजरा!
मलायकाला सापडली डायनासोरची अंडी! मलायकाने इन्स्टावर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तीन मोठ्या आकाराची अंडी दिसत आहेत. हा फोटो शेअर करत मलायकाने चाहत्यांना प्रश्न विचारला, ’ ही डायनासोरांना अंडी आहेत का?’ अर्जुन कपूर आणि मलायका अरोराचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दोघांचे मालदीवचे हे फोटो लोकांना खूप आवडत आहेत. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे नाते कोणापासून लपलेले नाही. दोघांनाही ते लपवायचे देखील नाही. अर्जुन आणि मलायका अनेकदा एकत्र वेळ घालवतात आणि बॉलीवूड मित्रांसह पार्टी करतात. विशेषतः करीना कपूर खान, करण जोहर आणि बहीण अमृता अरोरा.
अर्जुन कपूर नुकताच ‘भूत पोलीस’ या चित्रपटात दिसला होता, त्याच्या भूमिकेचे लोकांनी कौतुक केले होते. लवकरच तो ‘एक व्हिलन रिटर्न’मध्येही दिसणार आहे. तर मलायका अरोरा ‘इंडिया बेस्ट डान्सर 2’ या डान्स रिअॅलिटी शोला जज करताना दिसली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







