अर्जुन कपूरआधी बॉलिवूडच्या 'या' खानाशी जोडलं गेलं होतं मलायकाचं नाव

अर्जुन कपूरआधी बॉलिवूडच्या 'या' खानाशी जोडलं गेलं होतं मलायकाचं नाव

अर्जुनच्या अगोदर मलायकाचं नाव आणखी एका अभिनेत्याशी जोडलं गेलं होतं.

  • Share this:

मुंबई, 30 ऑक्टोबर : बॉलिवूडमध्ये नेहमीच कोणत्या ना कोणत्या कपलच्या अफेअरच्या सुरू असतात. सध्या अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या अफेअरची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र अर्जुनच्या अगोदर मलायकाचं नाव आणखी एका अभिनेत्याशी जोडलं गेलं होतं. तो अभिनेता म्हणजे अरबाज खान. मलायका आणि अरबाजचं फक्त नावच एकमेकांशी जोडलं गेलं नाही तर पहिल्याच नजरेत त्यांना एकमेकांवर प्रेमही झालं होतं. अरबाज आणि मलायकाची पहिली भेट 1993मध्ये 'मिस्टर कॉफी' नावाच्या एका ब्रॅन्डच्या जाहीरातीदरम्यान झाली होती. पहिल्या भेटीतच हे दोघंही एकमेकांकडे आकर्षित झाले होते. कालांतरानं त्याच्या या भेटीचं रुपांतर मैत्रीत झालं आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात.

जवळपास 5 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर मलायका आणि अरबाजनं 1998 मध्ये लग्न केलं. या लग्नातही मलायकाची भूमिका मोठी होती कारण, लग्नासाठी अरबाजनं मलायकाला प्रपोज केलं नव्हतं तर मलायकानं अरबाजकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. मलायका आणि अरबाज यांचं नातं अनेक वर्ष चांगलं चाललं. या दोघांना अरहान नावाचा एक मुलगाही आहे. पण काही काळानंतर या दोघांमध्ये मतभेद होऊ लागले आणि अखेर 2017मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. अरबाज पासून वेगळं झाल्यानंतर मलायकाचं नावं अर्जुन कपूरशी जोडलं गेलं.

‘बढ़ रही है नजदीकियाँ...’ विकी-कतरिनामधील वाढती जवळीक कॅमेऱ्यात कैद!

अर्जुन आणि मलायका यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या नात्याची जाहीर कबूली दिली. त्यानंतर मलायकानं पहिल्यांदाच अर्जुनसोबतचा फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला होता. त्यानंतर त्यांच्या लग्नाच्या चर्चांना वेग आला होता मात्र सध्या तरी आमचा लग्नाचा कोणताही विचार नसल्याच या दोघांनीही स्पष्ट केलं. सध्या आम्ही एकमेकांना जास्तीत जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न करत असून आम्ही एकमेकांची कंपनी एंजॉय करत असल्याच अर्जुननं एका मुलाखातीत सांगितलं होतं.

KBC11 : शिक्षिका असूनही देऊ शकली नाही या सोप्या प्रश्नाचं उत्तर, जिंकले इतके लाख

अर्जुनच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर तो लवकरच पानिपत या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमासाठी अर्जुननं खूप मेहनतही घेतली आहे. एवढंच नाही तर त्यानं अनेक महिने या सिनेमासाठी झीरो हेअरकट ठेवला होता. तर मलायका अनेकदा तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत असते. वयाच्या 45 व्या वर्षीही तिचा फिटनेस तरुण अभिनेत्रींना लाजवणारा आहे.

दिवाळीचं सेलिब्रेशन करताना 'या' अभिनेत्रीच्या लेहंग्याला लागली आग, थोडक्यात बचाव

==============================================================

SPECIAL REPORT : एक भाऊबीज अशीही...शहीदांच्या पत्नीसोबत साजरी केली दिवाळी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 30, 2019 01:38 PM IST

ताज्या बातम्या