KBC 11 : शिक्षिका असूनही देऊ शकली नाही 'या' सोप्या प्रश्नाचं उत्तर, जिंकले इतके लाख

KBC 11 : शिक्षिका असूनही देऊ शकली नाही 'या' सोप्या प्रश्नाचं उत्तर, जिंकले इतके लाख

बीना राठौर यांना काही सोप्या प्रश्नांची उत्तर देता न आल्यानं केबीसीमधून बाहेर व्हावं लागलं.

  • Share this:

मुंबई, 30 ऑक्टोबर : टीव्ही शो कौन बनेगा करोडपती सध्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवत आहे. या शोमध्ये अनेक स्पर्धक आपले अनुभव शेअर करत असतात. तर कधी कधी अमिताभ बच्चन सुद्धा आपल्या जीवनातील किस्से प्रेक्षकांशी शेअर करतात. अनेकदा हे स्पर्धक त्यांच्या आयुष्यातील कठीण काळ आठवून भावुक होताना दिसतात. अनेकांना त्यांच्या आयुष्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागलेला असतो. नुकत्याच प्रसारित झालेल्या केबीसीच्या एपिसोडमध्ये अशाच एक स्पर्धक बीना राठौर सहभागी झाल्या. बीना या गुजरातमध्ये शिक्षिका आहेत.

केबीसीमध्ये बीना राठौर यांनी फक्त 1 लाख 60 हजार रुपये जिंकले. मात्र त्यांना काही सोप्या प्रश्नांची उत्तर देता न आल्यानं केबीसीमधून बाहेर व्हावं लागलं. यातील एक प्रश्न असा होता की, कोणत्या राज्यात अद्याप महिला मुख्यमंत्री झालेली नाही. मात्र बीना या प्रश्नाचं उत्तर देऊ शकल्या नाहीत. याच उत्तर महाराष्ट्र असं होतं. यानंतर त्यांनी लाइफलाइनचा उपयोग कोला. तर अनेक कठीण प्रश्नांची उत्तरं मात्र त्यांनी पटापट दिली.

रिंकू राजगुरूचे दिवाळी सेलिब्रेशन; साडीतील फोटो पाहून चाहते झाले घायाळ!

बीना राठौर यांनी केबीसीमध्ये आपल्या कुटुंबांविषयी सांगितलं. बीना यांचे पती व्यवस्थित ऐकू शकत नाही तर त्यांच्या सासू-सासऱ्यांना बोलता येत नाही. बीना यांनी प्रेमविवाह केला असून त्यांनी आपल्या कुटुंबासमवेतचे अनुभव या ठिकाणी शेअर केले. त्या कशाप्रकारे आपल्या कुटुंबातील सदस्यांशी न बोलता त्यांची प्रत्येक गोष्ट समजून घेतात.

नेहा कक्करच्या गाण्यानंतर चाहत्यांनी सुरू केलं रडायला, VIDEO VIRAL

बीना यांनी सांगितलं की, त्या लग्नानंतर या कुटुंबासोबत खूश आहेत. जर त्या एखाद्या दुसऱ्या कुटुंबाच्या सदस्य असत्या तर त्या एवढ्या खूश कधीच नसत्या जेवढ्या त्या आता आहेत असंही बीना राठौर सांगतात. जर बीना आपल्या कुटुंबासोबत टीव्ही पाहत असतील तर त्या कोणत्याही जोकवर दोन वेळा हसतात. एकदा त्या स्वतः ऐकतात तेव्हा आणि एकदा त्या आपल्या घरातील सदस्यांना तो जोक समजावून सांगतात त्यावेळी त्या दुसऱ्यांदा हसतात.

राणू मंडल यांचा आणखी एक VIDEO VIRAL, सेटवर साजरी केली दिवाळी

===============================================================

SPECIAL REPORT : एक भाऊबीज अशीही...शहीदांच्या पत्नीसोबत साजरी केली दिवाळी

First published: October 30, 2019, 8:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading