मुंबई, 09 जुलै- अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षीत Mission Mangal सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमात अक्षयने राकेश धवन नावाच्या वैज्ञानिकाची भूमिका साकारताना दिसत आहे. अक्षयसोबत विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा यांसारखे स्टार या सिनेमात आहेत.अक्षयने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून टीझर शेअर करताना लिहिलं की, ‘एक देश. एक स्वप्न. एक इतिहास, भारताची मंगळ ग्रहापर्यंत जाण्याची खरी गोष्ट.’ या टीझरमध्ये एक रॉकेट अंतराळात पाठवण्यासाठी कशापद्धतीने तयारी केली जाते हे दाखवण्यात आले आहे.
टीझरच्या सुरुवातीला सेटेलाइटची एक झलक दाखवण्यात आली आहे. यानंतर सॅटेलाइटला लॉन्च करताना दाखवण्यात आले आहे. दरम्यान, सिनेमातील प्रत्येक व्यक्तिरेखेची काही सेकंदांमध्ये झलकही दाखवण्यात आली आहे. टीझरच्या शेवटी रॉकेट आकाशात जाताना दाखवण्यात आलं असून प्रदर्शनाची तारीखही दाखवली आहे. येत्या 15 ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
काही दिवसांपूर्वी सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. यात एका सॅटेलाइटवर सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट दाखवण्यात आली होती. हा फोटो शेअर करताना अक्षयने लिहिले होते की, ‘अशा विरांची कथा जे भारताला मंगळ ग्रहापर्यंत घेऊन गेले. ताकद, साहस आणि कधीही पराभव न मानण्याची ही कथा आहे. मिशन मंगल ही मंगळ ग्रहावर भारताचं स्पेस पाठवण्याची खरी कहणी आहे. येत्या 15 ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.’
अक्षयने मुलीसाठी केला हा सिनेमा- अक्षयने सोशल मीडियावर हा सिनेमा करण्यामागचं खरं कारण सांगितलं. अक्षयने त्याच्या मुलीसाठी हा सिनेमा साइन केला होता. सोशल मीडियावर त्याने लिहिले की, ‘मला आशा आहे की मिशन मंगल हा सिनेमा जेवढं तुमचं मनोरंजन करेल तेवढा हा सिनेमा तुम्हाला प्रेरितही करेल. हा सिनेमा मी माझ्या मुलीसाठी आणि त्यांच्या वयाच्या मुलांसाठी केला आहे. जेणेकरून त्यांना मंगळ अभियानाची खरी घटना कळेल.’
अक्षय कुमारच्या सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर, सूर्यवंशी सिनेमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत कतरिना कैफ असणार आहे. तसेच यानंतर करिना कपूर खानसोबत तो गुड न्यूज सिनेमात दिसणार आहे. यानंतर तो हाउसफुल्ल- 4 सिनेमातही काम करणार आहे.
Psycho Saiyaan च्या प्रेमात पडली श्रद्धा कपूर, ही भानगड आहे तरी काय?
Batla House Teaser- ‘तब तक यही जंग जारी रहेगी.. ये बाजी कभी ना तुम्हारी रहेगी’
जेव्हा निकच प्रियांकाचं असं फोटोशूट करतो
Published by:Madhura Nerurkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.