संजय दत्तच्या 'या' मराठी सिनेमात येणार बॉलिवूडचा हुकूमी एक्का, पाहा सिनेमाचा टीझर

संजय दत्तच्या 'या' मराठी सिनेमात येणार बॉलिवूडचा हुकूमी एक्का, पाहा सिनेमाचा टीझर

हा सिनेमा बाप- मुलाच्या नात्यावर भाष्य करतो. प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकाच्या मनाला भिडेल अशी या सिनेमाची कथा आहे.

  • Share this:

मुंबई, 08 जुलै- हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक गाजलेले चित्रपट दिलेला लोकप्रिय व रसिकांचे भरभरून प्रेम मिळालेला सुपरस्टार संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता यांनी आता मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आहे. ते ‘बाबा’ या त्यांच्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. नुकताच या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे बॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केल्यानंतर दीपक डोब्रियाल आता मराठी सिनेमात आपल्या अभिनयाची चमक दाखवायला सज्ज झाला आहे.

टीझरची सुरुवात एक मुलगा आणि त्याचा पाळीव कुत्र्यापासून होते. हा सिनेमा बाप- मुलाच्या नात्यावर भाष्य करतो. दीपकचा एकही संवाद टीझरमध्ये नसला तरी त्याच्या अभिनयाने तो प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो. दीपकचा मुलगा हा मुकबधीर असतो. त्याला मुकबधीरांच्या शाळेत टाकण्याबद्दल शिक्षक सांगतात. पण सर्वसामान्य मुलाप्रमाणेच आपल्या मुलाचीही वाढ व्हावी यासाठी त्याचे वडील अथक मेहनत घेताना दिसतात. एवढंच नाही तर घरातही त्याला सर्वसामांन्याप्रमाणेच वागवतात. भावनेला भाषेची गरज नसते ही सिनेमाची टॅगलाइनच सारं काही स्पष्ट करते.

ओमकारा, तनू वेड्स मनू, दबंग 2, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, हिंदी मीडियम यांसारख्या सिनेमात दीपकने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ''बाबा’ ही मनीष सिंग यांनी लिहिलेली कथा असून यात वडील आणि त्यांच्या मुलाची कथा सांगण्यात आली आहे. महाराष्ट्रातील निसर्गरम्य अशा कोकणातील एका सुंदर गावात ही कथा आकारली जाते. ही कथा प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकाच्या मनाला भिडेल अशी आहे, कारण त्यात एक साधेपणा आणि सोज्वळता आहे,' असं वक्तव्य सिनेमाच्या निर्मात्यांनी केलं. तर ‘बाबा’चे दिग्दर्शक राज आर गुप्ता म्हणाले, 'भावनांना भाषा नसते. ही गोष्ट आमच्या चित्रपटातील कलाकारांनी अगदी योग्यपणे अधोरेखित केली आहे. सर्व अडचणीवर मात करून एक कुटुंब एकत्र राहण्याचा कसा प्रयत्न करते, याची ही ‘कडू-गोड’ प्रसंगांनी भरलेली कथा आहे.'

ट्रेंडी समर ड्रेसमध्ये दिसला मलायकाचा हॉट लुक, एकदा हे फोटो पाहाच

जेव्हा निकच प्रियांकाचं असं फोटोशूट करतो

‘माझ्याविरुद्ध लिहितोस..’ भर पत्रकार परिषदेत रिपोर्टरवर भडकली कंगना रणौत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 8, 2019 03:34 PM IST

ताज्या बातम्या