मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /रणबीरच्या 'त्या' एका निर्णयामुळं Brahmastra चित्रपट बनवायला लागली 9 वर्षे, आयान मुखर्जीनं केला खुलासा

रणबीरच्या 'त्या' एका निर्णयामुळं Brahmastra चित्रपट बनवायला लागली 9 वर्षे, आयान मुखर्जीनं केला खुलासा

 बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'ब्रम्हास्त्र'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अशातच आता चित्रपटाचे दिग्दर्शक आयान मुखर्जीनं चित्रपटाला उशीर होण्याचं कारण सांगितलं आहे.

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'ब्रम्हास्त्र'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अशातच आता चित्रपटाचे दिग्दर्शक आयान मुखर्जीनं चित्रपटाला उशीर होण्याचं कारण सांगितलं आहे.

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'ब्रम्हास्त्र'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अशातच आता चित्रपटाचे दिग्दर्शक आयान मुखर्जीनं चित्रपटाला उशीर होण्याचं कारण सांगितलं आहे.

मुंबई, 16 जून : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor)आणि आलिया भट्टच्या (Alia Bhatt) बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'ब्रम्हास्त्र'चा ट्रेलर  (Brahmastra trailer) अखेर काल प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. ब्रम्हास्त्र सिनेमाच्या माध्यमातून हे स्टार कपल पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर सोबत झळकणार आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्याचबरोबर चित्रपटाच्या अनेक गोष्टी समोर येत आहेत. अशातच आता चित्रपटाचे दिग्दर्शक आयान मुखर्जीनं चित्रपटाला उशीर होण्याचं कारण सांगितलं आहे.

ब्रम्हास्त्र चित्रपट बनवण्यासाठी अयान मुखर्जीला (Ayan Mukharji) 9 वर्षे लागली. ETimes ला दिलेल्या मुलाखतीत आयाननं चित्रपटाला उशीर होण्याचं कारण सांगितलं.  जेव्हा मी ब्रम्हास्त्रची तयारी सुरू केली तेव्हा रणबीरला संजू ऑफर करण्यात आली. तो माझ्यासोबत तयारी सुरू करणार होता पण त्यानं आधी संजू चं चित्रिकरण सुरू करायचं ठरवलं. मला खूप राग आला. मात्र तो राजू हिराणीसोबत काम करतोय याचा मला आनंद झाला पण माझ्या प्रोजेक्टचे काय?, असंही वाटत होतं.

हे ही वाचा - Brahmastra Trailer: 'ब्रह्मास्त्र'चा ट्रेलर पाहून KRK एकदा नाही तर तीनवेळा खुर्चीवरून पडला, काय आहे नेमकं प्रकरण?

रणबीरनं संजूला प्राधान्य देऊन योग्य निर्णय घेतल्याचं मला नंतर जाणवलं. काही वर्षांनी संजूचं चित्रिकरण पूर्ण झालं. चित्रपट संपादन आणि रिलीजसाठी तयार झाला आणि माझं  प्री-प्रॉडक्शनही पूर्ण झालं नव्हतं. रणबीरनं वाट पाहिली असती तर खूप उशीर झाला असता.

वाचा-आमिर खानची लगान फिल्म Brodway Show मध्ये रूपांतरित होणार?

ये जवानी है दिवानी प्रदर्शित झाल्यानंतरच अयानने 2014 मध्ये ब्रह्मास्त्रचं प्री-प्रॉडक्शन सुरू केले होतं. अयान आणि रणबीरनं ब्रम्हास्त्रमध्ये  तिसऱ्यांदा एकत्र काम केलं आहे. यापूर्वी दोघांनी वेक अप सिड आणि ये जवानी है दिवानीमध्ये काम केले आहे.

" isDesktop="true" id="717979" >

दरम्यान, आठ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, हा चित्रपट अखेर 9 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. पौराणिक कथेचा आधार घेऊन बनवलेला हा चित्रपट तीन भागांमध्ये रिलीज होणार आहे. त्याचा पहिला भाग शिवा हा 9 सप्टेंबरला रिलीज होत आहे. हिंदी, तमीळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत हा सिनेमा रिलीज होत आहे.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood, Bollywood News, Entertainment, Movie release, Ranbir kapoor