जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / आमिर खानची Lagaan फिल्म Brodway Show मध्ये रूपांतरित होणार?

आमिर खानची Lagaan फिल्म Brodway Show मध्ये रूपांतरित होणार?

आमिर खानची Lagaan फिल्म Brodway Show मध्ये रूपांतरित होणार?

आमिर खान प्रॉडक्शन निर्मित लगान चित्रपटाचे हक्क यूकेमधील अनेक निर्माते घेत असल्याचं समोर आलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 15 जून : अभिनेता आमिर खान (Amir Khan) नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असलेला पहायला मिळतो. अशातच आमिरचा लगान (lagaan) हा चित्रपट 15 जून  2001 रोजी रिलीज झाला होता. अद्यापही चित्रपटाची क्रेझ काही कमी झाली नाही. हा दमदार चित्रपट ऑस्करसाठी नामांकित झाला होता. आता या चित्रपटाला रिलीज होऊन 21 वर्ष (Lahan Movie complete 21 years) झाली आहेत. त्यामुळे आज पुन्हा एकदा या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. ‘लगान’ लवकरच यूकेमध्ये ब्रॉडवे शो (Uk Brodway Show) म्हणून रुपांतरीत होणार’ असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे एक आनंदाची समोर आली आहे. आमिर खान प्रॉडक्शन निर्मित लगान चित्रपटाचे हक्क यूकेमधील अनेक निर्माते घेत असल्याचं समोर आलं आहे. यूकेमधील अनेक निर्मात्यांनी आमिर खान प्रॉडक्शन हाऊसकडे लगान चित्रपटाच्या हक्काची मागणी केली आहे. हे ही वाचा -  मेट्रोमध्ये केलेल्या ‘या’ कृत्यानं वरुण-कियारा ट्रोल, VIDEO पाहून नेटकऱ्यांना संताप अनावर

 एएनआयच्या माहितीप्रमाणे, आमिर खानच्या टीमने याबद्दल अंतिम निर्णय घ्यायचा बाकी आहे. यूकेमध्ये ब्रॉडवेनुसार भारतीय चित्रपट पाहणे उत्सुकतेचे ठरेल त्यामुळे याविषयी अंतिम निर्णय काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लगान या चित्रपटानं अनेक पुरस्कार पटकावले आहेत. या चित्रपटाला आठ फिल्मफेअर अवॉर्ड्स तर आठ स्क्रीन अवॉर्ड्स मिळाले आहेत. तसेच या चित्रपटाला आठ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. आमिरसोबतच या चित्रपटामध्ये  कुलभूषण खरबंदा, रघुवीर यादव, राजेश विवेक, प्रदीप रावत, दया शंकर पांडे या कलाकारांनी देखील महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या होत्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात