जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Brahmastra Trailer: 'ब्रह्मास्त्र'चा ट्रेलर पाहून KRK एकदा नाही तर तीनवेळा खुर्चीवरून पडला, काय आहे नेमकं प्रकरण?

Brahmastra Trailer: 'ब्रह्मास्त्र'चा ट्रेलर पाहून KRK एकदा नाही तर तीनवेळा खुर्चीवरून पडला, काय आहे नेमकं प्रकरण?

Brahmastra Trailer: 'ब्रह्मास्त्र'चा  ट्रेलर पाहून KRK एकदा नाही तर तीनवेळा खुर्चीवरून पडला, काय आहे नेमकं प्रकरण?

Brahmastra Trailer: अयान मुखर्जीच्या बहुचर्चित ‘ब्रह्मास्त्र’चा ट्रेलर (Brahmastra trailer) अखेर आज रिलीज झाला आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्टला (Ranbir Kapoor & Alia Bhatt) ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 15 जून-   अयान मुखर्जीच्या बहुचर्चित ‘ब्रह्मास्त्र’चा ट्रेलर  (Brahmastra trailer) अखेर आज रिलीज झाला आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्टला    (Ranbir Kapoor & Alia Bhatt)  ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक होते. सर्वजण बऱ्याच दिवसांपासून ट्रेलरची वाट पाहत होते. काहींना साहसी आणि काल्पनिक गोष्टींनी भरलेला हा ट्रेलर प्रचंड आवडला आहे. तर काहींना ट्रेलरमध्ये केवळ स्पेशल इफेक्ट्सचा परिणाम पाहायला मिळत आहेत.दरम्यान ट्रेलर रिलीज झाल्यानंतर, सर्वात वादग्रस्त समीक्षक केआरकेने (कमाल आर खान) (KRK) ट्रेलरला टॉप क्लास अॅब्सर्ड म्हणत टीका केली आहे. ‘ब्रह्मास्त्र’चा ट्रेलर पाहिल्यानंतर केआरके म्हणजेच कमाल आर खानने एकापाठोपाठ एक अनेक ट्विट केले आहेत. आणि आपली प्रतिक्रिया देत या चित्रपटाला टॉप क्लास अॅब्सर्ड म्हटलं आहे. तसेच रणबीर, आलियापासून ते मौनीपासून रॉयपर्यंत कोणीही या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर बुडण्यापासून वाचवू शकणार नसल्याचंही त्याने म्हटलं आहे.

News18

केआरकेने आणखी एक ट्विट करत लिहिलंय, ‘आत्ताच ट्रेलर पाहिला आणि मी काय बोलू, अरे देवा! ब्रह्मास्त्र ट्रेलर हा टॉप क्लासचा मूर्खपणा आहे. रणबीर कपूरकडे ब्रह्मास्त्र आहे आणि खलनायक मौनी रॉयला ते ब्रह्मास्त्र हवं आहे. आगीचा रणबीर कपूरवर काहीच परिणाम होत नाही. आलिया एखाद्या सैतानासारखी दिसत आहे, आणि ती रणबीरच्या प्रेमात पडली आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कोणीही वाचवू शकत नाही’. असं केआरकेने म्हटलं आहे.

News18

त्याने पुन्हा एक ट्विट करत लिहिलंय, ‘आतापर्यंत मी रिव्ह्यूसाठी कधीही 6 पानांची स्क्रिप्ट लिहिलेली नाही. पण मी या ट्रेलरच्या रिव्ह्यूसाठी 6 पाने लिहिली आहेत. मला हे सांगताना खंत वाटतं आहे की, 3 मिनिटांच्या ट्रेलरचा रिव्ह्यू 15 मिनिटांपेक्षा कमी होणार नाही. 650 कोटींमध्ये बनवलेल्या या चित्रपटाला 9 वर्षांचा कालावधी लागला आहे. केआरकेने ट्विट करत पुढं लिहिलंय,’ ब्रह्मास्त्रचा रिव्ह्यू रेकॉर्ड करताना तो 3 वेळा हसत हसत खुर्चीवरून पडला. ब्रह्मास्त्रच्या ट्रेलरचा रिव्ह्यू मांडताना त्याला खूप मजा येत आहे’’.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात