अर्जुननं शेअर केला 'पानीपत'चा BTS VIDEO, चर्चा मलायकाच्या कमेंटची!

अर्जुननं शेअर केला 'पानीपत'चा BTS VIDEO, चर्चा मलायकाच्या कमेंटची!

अर्जुननं त्याचा सिनेमा ‘पानीपत’च्या पूर्वतयारीच्या वेळचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.

  • Share this:

मुंबई, 05 डिसेंबर : अभिनेता अर्जुन कपूर आणि स्टाइल आयकॉन मलायका अरोरा यांच्या नात्याची सध्या बॉलिवूड ते सोशल मीडियापर्यंत सगळीकडेच सुरू असते. हे दोघंही अनेकादा सोशल मीडियावर एकमेकांच्या फोटोंवर कमेंट करताना दिसतात. ज्यामुळे ते चर्चेत येतात. आताही काहीसं असंच झालं आहे. अर्जुननं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर मलायका अरोरानंही कमेंट केली आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ 3 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

अर्जुननं त्याचा आगामी सिनेमा ‘पानीपत’च्या पूर्वतयारीच्या वेळचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या सिनेमासाठी अर्जुननं डोक्याचे सर्व केस काढले होते. ज्यामुळे जवळपास 9 महिने त्याला कॅप घालून फिरावं लागत असे. जेव्हा त्यानं पहिल्यांदा टक्कल केलं त्यावेळचा हा व्हिडीओ त्यानं सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, 'मला अजिबात विश्वास नाही बसत आहे की हा सिनेमा रिलीजसाठी तयार आहे. जानेवारी मध्ये मी हा व्हिडीओ शूट केला होता. जेव्हा आम्ही नव्या वर्षाच्या स्वागतानंतर पुन्हा शूटिंगला सुरुवात केली होती. हा माझ्या शानदार प्रवासाचा अर्धा हिस्सा आहे. सदाशिवराव भाऊ पेशव्यांची भूमिका साकारायला मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो.'

अभिनेत्रीची काढली छेड, जाब विचारताच रोमिओनं केली मारहाण, PHOTO VIRAL

 

View this post on Instagram

 

I can’t believe the film is about to come out... I shot this in January when we were about to begin shooting again after the new year break... it’s been a journey and a half. So grateful for the chance to play Bhau... 48 hours to go...

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on

अर्जुननं शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये त्याचा हेअर स्टायलिस्ट आलिम हकीम त्याची दाढी आणि केसांना ट्रीम करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अर्जुनचा तो लुक आहे ज्यात तो पानीपत सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा उद्या म्हणजेच 6 डिसेंबरला रिलीज होणार आहे. अर्जुनचा हा बिहाइंड द सीन्स व्हिडीओ 3 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. यावर त्याच्या चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोरानं सुद्धा यावर कमेंट करताना हार्ट शेपचा इमोज पोस्ट केला आहे.

VIDEO: अर्जुन कपूरचा फोटो पाहून लाजली मलायका अरोरा आणि म्हणाली...

मलायका-अर्जुनच्या नात्याबद्दल बोलायचं तर त्यांनी काही महिन्यांपूर्वीच हे नातं ऑफिशिअली मान्य केलं. त्यानंतर अनेक मुलाखतीत हे दोघंही एकमेकांबद्दल बोलताना दिसले. त्यानंतर या दोघांनी अनेक रोमँटिक फोटो सुद्धा शेअर केले. मात्र लग्नाच्या बाबत मात्र या दोघांनी अद्याप असा कोणताही प्लान नसल्याचं सांगितलं.

घटस्फोटाच्या आदल्या रात्री नेमकं काय झालं होतं, मलायकानं केला खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 5, 2019 04:39 PM IST

ताज्या बातम्या