VIDEO: अर्जुन कपूरचा फोटो पाहून लाजली मलायका अरोरा आणि म्हणाली...

VIDEO: अर्जुन कपूरचा फोटो पाहून लाजली मलायका अरोरा आणि म्हणाली...

नुकताच एका इव्हेंटमध्ये मलायकाला अर्जुन बद्दल एक प्रश्न विचारण्यात आला ज्यावर दिलेल्या उत्तरामुळे मलायका चर्चेत आली आहे.

  • Share this:

मुंबई, 05 डिसेंबर : अभिनेत्री मलायका नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते. कधी बोल्ड फोटोशूट तर कधी रिलेशनशिप. काही काळापूर्वी मलायका-अर्जुननं त्यांचं रिलेशन कबुल केल्यानंतर अनेकदा हे दोघंही त्यांच्या नात्याबद्दल मोकळेपणानं बोलताना दिसले. नुकताच एका इव्हेंटमध्ये मलायकाला अर्जुन बद्दल एक प्रश्न विचारण्यात आला ज्यावर दिलेल्या उत्तरामुळे मलायका चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे हा प्रश्न एका फंक्शनमध्ये तिला सर्वांसमोर विचारण्यात आला होता. प्रश्न ऐकल्यावर मलायका आधी लाजली आणि मग तिनं एकदम मजेशीर अंदाजात उत्तर दिलं आणि उत्तर देताना तिच्या चेहऱ्यावर लाली पसरली होती.

मुंबईमध्ये नुकताच फिल्मफेअर अवॉर्ड पार पडला. यावेळी मलायकाला दीवा ऑफ द इयर या अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं. यावेळी अवॉर्ड घेण्यासाठी मलायका स्टेजवर गेली असता होस्ट सोफी चौधरीनं मलायकाला अर्जुनबद्दल एक प्रश्न विचारला. सोफी मलायकाला म्हणाली, तुझा एक टच कसं एखाद्या व्यक्तीला दीवाना बनवून टाकतो. त्याचवेळी बॅकग्राउंडला अर्जुन कपूरचा फोटो होता. तो पाहिल्यावर मलायका चक्क लाजली आणि म्हणाली मी आता यावर हसू की उत्तर देऊ.

शाहरुख-सलमान-आमिरमुळे उद्ध्वस्त झालं या HOT अभिनेत्रीचं करिअर

 

View this post on Instagram

 

Malaika Arora looking stunning at Filmfare #glamourandstyleawards #malaikaarora . . . #bollywoodlife #hotbollywood#bollywoodfilms #bollywoodreplica #bollywoodcinema#bollywoodmakeup #bollywoodsinger #bollywoodvideo#bollywoodtransition #bollywoodhot #bollywoodcelebrity#bollywoodupdates #bollywoodnight #bollywoodworld#bollywoodbeauty #bollywoodcouple #bollywoodhottie#bollywoodtheme #bollywoodfans #bollywooddialogue#bollywooddiva #bollywoodactoractress #bollywoodking#bollywoodfilm #bollywoodactresses

A post shared by Bollywood Trending Story (@bollywoodtrendingstory) on

यानंतर मलायका म्हणाली, ‘तो माझ्यापेक्षा मोठा दिवा आहे.’ मलायकाचं उत्तर ऐकून सर्वांनाच हसू आवरेनासं झालं. या संपूर्ण इव्हेंटमध्ये मलायका खूपच ग्लॅमरस अंदाजात दिसली. तिनं या इव्हेंटमध्ये मिरर ड्रेस घातला होता. हा ड्रेस संपूर्ण इव्हेंटमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. त्यामुळे या इव्हेंटमध्ये मलायका सर्वांपेक्षा वेगळी भासत होती.

फिटनेस जपताना 'हे' पदार्थ खाणं कटाक्षानं टाळतो शाहीद कपूर

मलायका-अर्जुनच्या नात्याबद्दल बोलायचं तर त्यांनी काही महिन्यांपूर्वीच हे नातं ऑफिशिअली मान्य केलं. त्यानंतर अनेक मुलाखतीत हे दोघंही एकमेकांबद्दल बोलताना दिसले. त्यानंतर या दोघांनी अनेक रोमँटिक फोटो सुद्धा शेअर केले. मात्र लग्नाच्या बाबत मात्र या दोघांनी अद्याप असा कोणताही प्लान नसल्याचं सांगितलं. अर्जुनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं तर त्याचा ‘पानीपत’ हा सिनेमा 6 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

'पानिपत' सिनेमा का पाहावा? राज ठाकरेंनी केलं 'हे' आवाहन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 5, 2019 09:20 AM IST

ताज्या बातम्या